BJP's method is now becoming like Hitler's. The policy is to take with you, intimidate or crush whoever comes with you. In these words Shiv Sena chief Uddhav Thackeray has released his criticism. Uddhav Thackeray met Shiv Sena MP Sanjay Raut's family. Then Uddhav Thackeray made this comment. He said, what is Sanjay Raut's fault? What is their crime? He has been arrested. Today I have met Sanjay Raut's family. Current politics is going on in a very disgusting way. He also explained that BJP's politics is very disgusting.

Shiv Sena chief Uddhav Thackeray’s criticism: भाजपची पद्धत आता हिटलरप्रमाणे!

मुंबई।भाजपची (BJP)पद्धत ही आता हिटलरप्रमाणे होऊ लागली आहे. जो आपल्यासोबत येईल त्याला सोबत घ्या, धाक दाखवा किंवा चिरडून टाका असे  धोरण चालले  आहे.अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी टीकास्त्र सोडले आहे. 

शिवसेना खासदार  संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची  उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे भाष्य केले. ते म्हणाले, संजय राऊत यांची चूक काय? त्यांचा गुन्हा काय? त्यांना अटक करण्यात आली आहे. आज मी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. सध्याचे  राजकारण अत्यंत घृणास्पद पद्धतीने सुरू आहे. भाजपचे  राजकारण हे अत्यंत घृणास्पद आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. (Shiv Sena chief Uddhav Thackeray’s criticism)
जे. पी. नड्डा (J.P.Nadda) यांनी जे वक्तव्य केले  आहे ती घृणा दाखवण्याचीच सुरूवात आहे. शिवसेना किंवा इतर पक्ष संपवायचे  असेल तर संपवा. कोश्यारी जे म्हणाले हिंदूंमध्ये फूट पाडायचीच सुरूवात आहे. नड्डा जे म्हणाले, त्यातून भाजपचे  कारस्थान भेसूरपणे समोर आले आहे. असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले . भाजपची पद्धत ही आता हिटलरप्रमाणे होऊ लागली आहे. जो आपल्यासोबत येईल त्याला सोबत घ्या, धाक दाखवा किंवा चिरडून टाका असे  धोरण चालले  आहे. 
काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरी  (Nitin Gadkari)म्हणाले होते.  तसेच आता मलाही वाटू लागले  आहे. सगळ्या जनतेनी या घाणेरड्या राजकारणाची ओळख करून घ्यावी. प्रादेशिक अस्मिता चिरडण्याचे  काम भाजपकडून केले  जात आहे असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. संजय राऊत यांची चूक नसताना ते स्पष्ट बोलतात म्हणून अटक करण्यात आली आहे. राजकारण हा बुद्धिबळाचा खेळ मानला जातो. भाजपकडून बळाचा वापर सातत्याने केला जातो. मात्र वेळ प्रत्येकाची येते, देश कुठे चालला आहे कुठल्या दिशेने चालला हे जनता ठरवते, हे विसरू नका असाही इशाराही  उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *