पुणे|
राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी सोमवारी सर्वसामान्यांप्रमाणे पुणे मेट्रोतून प्रवास करून मेट्रोच्या कामांची माहिती घेतली.
पिंपरीतील फुगेवाडी मेट्रो स्टेशनला शरद पवार यांनी अचानक भेट दिली यावेळी पवार यांनी फुगेवाडी ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका असा मेट्रो प्रवासही केला. पुणे मेट्रोचे काम सध्या गतीने सुरू आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये तर मेट्रोच्या यशस्वी चाचण्या पार पडल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमधील ही मेट्रो प्रवाश्यांच्या सेवेसाठी सज्ज आहे. या दरम्यान शरद पवार यांनी आज मेट्रोने प्रवास केल्याचे पाहायला मिळाले.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रोचे काम कोरोनामुळे बंद पडले होते. या कामाला गती कधी मिळणार याकडे सर्व पुणेकरांचे लक्ष होते. दरम्यान, मधील काळात पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या 6 किलोमीटर प्राधान्य मार्गावर मेट्रोची चाचणी यशस्वी झाली होती. त्यामुळे ती आता मेट्रो प्रवाशांसाठी सज्ज असणार आहे. यातच आज शरद पवार यांनी फुगेवाडी स्टेशनला भेट दिली, तेव्हा त्यांनीही मेट्रोतून प्रवास केला.