पंतप्रधान मोदी यांना सत्तेतून पायउतार करणे आणि समविचारी पक्षांची सत्ता देशावर आणण्यासाठी महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट स्थापन (Mahavikas Aghadi, India Front)करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा पहिला मेळावा शनिवारी काँग्रेस भवन येथे पार पडला. यावेळी पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे , डॉ. अमोल कोल्हे, नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य चंद्रकांत हांडोरे, शिवसेना संपर्कनेते सचिन अहिर , माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार संजय जगताप, रवींद्र धंगेकर, वंदना चव्हाण यांच्यासह इंडीया फ्रंटच्या विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले कि,गेल्या साठ-सत्तर वर्षात आपण अनेक राज्यकर्ते पाहिले. भाजपचे अटलबिहारी वाजपेयी यांचेही सरकार पाहिले. मात्र गेल्या आठ ते दहा वर्षात मोदी यांची भूमिका देशाला दिशा देण्याचे काम करणाऱ्यांविषयी देशातील जनतेच्या मनात घृणा निर्माण करण्याचे काम करणारी अशीच आहे. मोदी हे सतत जवाहरलाल नेहरू व त्यांच्या कुटुंबावर हल्ले करत त्यांना बदनाम करण्याचे काम करत आहेत. नेहरूंनी देश प्रगतीच्या मार्गावर नेला, हे संपूर्ण जग मान्य करत आहे, मात्र मोदी ते मान्य करत नाहीत.असेही ते म्हणाले.
‘मोदी की गॅरंटी’ची उडवली खिल्ली