मुंबई ।पहिल्यांदाच निवडून आलेले (The first elected MLAs will go to Delhi for training) आमदार प्रशिक्षणासाठी दिल्लीला जाणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी आपल्या दिल्ली येथील निवासस्थानी स्नेह भोजनासाठी आमंत्रित केले आहे.
५ एप्रिलला सायंकाळी हा डिनर डिप्लोमेसीचा (‘Dinner Diplomacy’) कार्यक्रम होणार आहे. मात्र या कार्यक्रमादरम्यान सर्व आमदारांना शरद पवार कोणता कानमंत्र देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दोन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी सर्व आमदार हे दिल्लीला असून, 5 आणि 6 एप्रिलला हे प्रशिक्षण होणार आहे. महाविकास आघाडीचे सर्व आमदार दिल्लीत असल्यामुळे शरद पवार यांनी या सर्व आमदारांना आपल्या घरी स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे.गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये संवादाचा अभाव आहे. निधीअभावी शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांची उघड नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर या स्नेहभोजनादरम्यान शरद पवार आमदारांना कोणता कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचेच लक्ष असणार आहे.