मुंबई ।
राज ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे (Raj Thackeray’s grandfather Prabodhankar Thackeray) हे आपले आदर्श आहेत. आपल्या धर्माचे प्रदर्शन आपण कधीही करत नाही. आतापर्यंत जेवढ्या वेळा निवडणुकीसाठी आपण उभे राहिलो, त्यावेळी बारामतीमध्ये (Baramati ) आपण कोठे नारळ फोडतो याची माहिती राज ठाकरेंनी घ्यावी, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष (NCP president Sharad Pawar) शरद पवार यांनी राज ठाकरे यांना पत्रकार परिषदेतून लगावला.
मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पवार म्हणाले, देव धर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तीवर प्रबोधनकारांनी नेहमीच टीका केली. धर्माचा गैरफायदा घेणाऱ्या घटकांना ठोकून काढा, असे नेहमीच प्रबोधनकारांनी सांगितले. आपण नेहमीच प्रबोधनकारांचे लिखाण वाचतो ;पण ठाकरे कुटुंबातील लोक प्रबोधनकार वाचत नसावेत. त्यामुळे त्यांच्यावर बोलण्याची गरज नाही,अशी उपरोधिक टीकाही शरद पवारांनी यावेळी केली.
महागाई, बेरोजगारी या मुद्द्यावर ते काही बोलत नाहीत…
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष संपणारा नसून इतर पक्षांना संपवणार आहे, असे राज ठाकरे आपल्या भाषणातून काय म्हणाले. मात्र, त्यांच्या पक्षाला मतदारांनी विधानसभेच्या निवडणुकीत दोन जागा दिली नाही. राज ठाकरेंच्या केवळ सभा मोठ्या होतात त्या सभेमध्ये ते शिवराळ भाषा वापरतात, नकला करतात म्हणून लोकांची करमणूक होते, असा खोचक चिमटाही पवारांनी यावेळी काढला. तसेच राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून धार्मिक, सामाजिक मुद्दे बोलून दाखवले. मात्र, सामान्य जनतेसमोर सध्या उपस्थित असलेले महागाई, बेरोजगारी या मुद्द्यावर ते काही बोलत नाहीत. सामाजिक एकतेला धक्का देण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे, अशीही टीका शरद पवार यांनी राज ठाकरेंवर केली.
सभेत राज ठाकरे म्हणाले होते…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नास्तिक आहेत, ते देवधर्म मानत नाहीत. तसेच शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव शरद पवार नेहमी घेतात. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना शरद पवार कधीही दिसत नाहीत, अशी टिप्पणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray)राज ठाकरे यांनी त्यांच्या मंगळवारी (दि. 12 एप्रिल) झालेल्या सभेत केली होती.