नाशिक।कोणाला काहीही आवडेल. मात्र आमच्याकडे शक्ती नाही, संख्याही नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही,अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार यांना भविष्यात मुख्यमंत्री करण्याच्या चर्चांवरुन (Sharad Pawar has criticized Ajit Pawar for making him Chief Minister in the future.) टोला लगावला आहे.
अजितदादांना मुख्यमंत्री करायचेय, त्यामुळे कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी जाहीर कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना केले होते. आमदार निलेश लंकेंनी आता पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच आणि तेही अजितदादाच असे जाहीरपणे बोलून दाखवले. निलेश लंके ज्यावेळी बोलत होते त्यावेळी अजित पवारही उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
शरद पवार म्हणाले, कोणाला काहीही आवडेल. पण तुमची तेवढी संख्या असली पाहिजे ना? जर आम्ही क्रमांक एकचा पक्ष असतो, तर आमच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. पण आज आमच्याकडे शक्ती नाही, तेवढी संख्याही नाही. त्यामुळे यावर आता भाष्य करणे योग्य वाटत नाही. असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
शरद पवार पुढे म्हणाले, मोदी यांच्या मुंबईत येण्याने राज्याचे हित होत असेल, राज्याला काही मिळणार असेल तर त्यांच्या येण्याला आमची काही हरकत नाही. मात्र ते येथे येऊन राजकीय भाषण करत असतील तर त्याचा विचार त्यांनीच करावा.काँग्रेसमध्ये वाद नाही, चर्चा होत असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा हा मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आला होता. अशी टीका पवारांनी केली.(Sharad Pawar: We don’t even have the strength and numbers for the post of Chief Minister!)