Raj Thackeray of MNS has changed the party's policies by raising the issue of buzzing in mosques. This journey of development from blueprint to Hindutva has started. The advantage of this is that the state of the party will tell the future. However, while responding to the criticism made by NCP's Sarvesarva Sharad Pawar to Raj Thackeray, who has embarrassed the NCP by trapping the Shiv Sena, these three questions have been asked. Will Raj Thackeray give the answer in the meeting to be held on 1st May on Maharashtra Day? This has caught the attention of political circles.

Sharad Pawar vs Raj Thackeray:शरद पवारांच्या ‘त्या’ तीन प्रश्नांना राज ठाकरे सभेत उत्तर देणार?

पुणे। मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा घेऊन मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी  पक्षाची धोरणे ​बदललेली आहेत.प्रखर हिंदुत्वाचा गजर करीत, किंबहुना त्या जोरावर मनसेचे अस्तित्व टिकविण्यासाठी राजकीय वाटचालीची दिशाच  बदलली आहे. विकासाची ब्लु प्रिंट ते हिंदुत्व  असा हा प्रवास सुरु झाला आहे.  त्याचा फायदा होतो कि,पक्षाची  दशा हे येणारा काळच सांगणार आहे. मात्र शिवसेनेला (SHIVSENA) खिंडीत पकडताना राष्ट्रवादीची (NCP) कोंडी करणाऱ्या राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (  Sharad Pawar) यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, जे तीन प्रश्न विचारले आहेत. (Will Raj Thackeray answer Sharad Pawar’s ‘those’ three questions) त्याचे उत्तर महाराष्ट्रदिनी दि १ मे रोजी  औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) देणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला पवारांनी प्रत्युत्तर देताना राज्यासाठीची दूरदृष्टी असलेल्या महात्मा फुलेंचे  नाव का घ्यायचे  नाही?,राज्यातल्या गोरगरीबांसाठी झटणाऱ्या शाहू महाराजांचे  नाव का घ्यायचे  नाही?,देशाचे  संविधान लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे  नाव का घ्यायचे  नाही? हे तीन प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यावर काय बोलतात,याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी घालून दिलेल्या  १६ अटी शर्तींनुसार ही  सभा घ्यावी लागणार असली तरी त्या अटींचा भंग होतो का हेही यानिमित्ताने महत्वाचे ठरणार आहे. मात्र या सभेच्या आधीच शरद पवार यांनी तीन प्रश्न उपस्थित केल्याने,त्याला राज ठाकरे  (Raj Thackeray)हे काय उत्तर देतात हे जितके महत्वाचे आहे,त्याहीपेक्षा मशिदींवरील भोंगे यावरील  भाष्याची पुनरावृत्ती ते टाळतात का हा भाग महत्वाचा ठरणार आहे. शिवसेनेनेही मनसेसह (MNS) भाजपला   (BJP) टक्कर देण्यासाठी राज्यात विशेषतः मराठवाड्यात लक्ष केंद्रित केले असून राज्यात सभाही घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे १४ मे रोजी मुंबईतील बीकेसी येथे शिवसेना (SHIVSENA) पहिली भव्य सभा घेणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात सभा घेण्यात येणार आहेत. दुसरी सभा मराठवाड्यात होणार आहे. त्यामुळे आता विरोधकांच्या हल्ल्याला प्रतिहल्ला करण्याची तयारी शिवसेनेने केली असून तसे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत. त्यामुळे हिंदुत्वावर राजकीय आखाडा पेटणार असला तरी उद्या औरंगाबाद सभेत राज ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शरद पवारांवर राज ठाकरेंनी केलेली टीका काय होती?
 राज ठाकरे यांनी पवारांवर (What was Raj Thackeray’s criticism of Sharad Pawar?) टीका करताना म्हटले होते की ,शरद पवार यांची एक मुलाखत घेतली होती . त्यावेळी त्यांचे  वय पाहून मी फार खोलात गेलो नाही. शरद पवार जेव्हा जेव्हा भाषण करतात, राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासून त्यावेळी ते म्हणतात, हा महाराष्ट्र शाहू, फुले आंबेडकरांचा आहे. मान्यच आहे.मात्र  त्याआधी हा महाराष्ट्र सर्वप्रथम कुणाचा असेल तर तो आमच्या छत्रपती शिवरायांचा आहे. मात्र शरद पवार कधीही छत्रपतींचे  नाव घेताना तुम्हाला कुठल्याही सभेत दिसणार नाहीत. छत्रपतींचे  नाव घेतल्यानंतर जर मुस्लिम मते  गेली तर काय करायचे ? त्यामुळेच ते शाहू, फुले, आंबेडकर असाच उल्लेख करतात. छत्रपतींवरचे  राजकारण करायचे  असेल, मराठी बांधवांची माथी भडकवायची असतील तर ब्राह्मणांनी पुस्तकं लिहिलीत, मग इतरांनी काहीतरी लिहिले . अफझल खान इथे आला होता त्यावेळी महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला पण त्यात हिंदू मुस्लिम असे  काही नव्हते  हे पवार म्हणाले आहेत. मग तो कशासाठी आला होता? तो काय केसरी टूर्सचे  तिकिट घेऊन आला होता का? असे  विचारत राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली होती.

​पवारांचे प्रत्युत्तर 

मध्यंतरी (Pawar’s reply) एका नेत्याने माझ्यावर टीका केली की​,​ मी फुले आंबेडकर, शाहूराजा यां​चे  केवळ नाव घेतो. मी त्यांना विचारू इच्छितो​. फुलें​चे  नाव का मी घ्याय​चे  नाही? ज्यांनी समाजाला सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला​. ​ ज्यांच्या पत्नीने आप​ले  आयुष्य लोकांच्या शिक्षणासाठी घालव​ले ,  त्यां​चे  नाव घ्याय​चे नाही. ज्यावेळी इंग्रज सरकार हो​ते , त्यावेळी इंग्रज राजा महाराष्ट्रात आला होता​. ​ त्यावेळी ज्योतिबा फुले यांनी स्वतः त्या राजाला एक निवेदन दिल हो​ते.  त्यामध्ये लिहि​ले  हो​ते . दुष्काळ पडला आहे​. ​ त्यामुळे आम्हाला खडी फोडण्याची शिक्षा देऊ नका. त्यऐवजी राज्यात धरणे बांधा. ​म्हणजे ​त्यांना दूरदृष्टी होती.
शाहू महाराज सामान्यांचे राजे होते. ते शहरात कधीही राहिले नाहीत. गोरगरीबाला भेटत असत. त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी आयुष्य वेच​ले . आधुनिकेतचा विचार करणारे शाहू महाराज होते. त्यां​चे  नाव का घ्याय​चे  नाही? ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशा​चे  संविधान तयार के​ले  त्यां​चे  नाव का घ्याय​चे  नाही? यासोबतच आणखी एक महत्त्वच काम के​ले , ते म्हणजे ते ज्यावेळी ते देशाचे जलसंपदा मंत्री होतें ​. ​त्यावेळी ​त्यांनी  देशात मोठी धरणे बांधली. वीज निर्मिती केंद्रे उभारली.

सध्या राज्यात जात धर्माचा वापर करून लोकांना आणखी मागे घेऊन जायचा प्रयत्न सुरु आहे. जे मूळ प्रश्न आहेत​,​ ते बाजूला सारून धार्मिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे सगळे सुरु असताना आप​ले  मूलभूत प्रश्न सुटणार आहे का. केवळ सर्वांना मूलभूत प्रश्नांकडून बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरू आहे अ​सेही शरद पवार यांनी म्हट​ले  आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *