Sharad Pawar: The words used by Chandrakant Patlani should not have been used!

Sharad Pawar:चंद्रकांत पाटलांनी जे शब्द वापरले ते वापरायला नको होते!

मुंबई। चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांच्यावरील शाईफेकीचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाहीच. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वापरलेला शब्द चुकीचाच होता. त्यांनी  जे शब्द वापरले ते वापरायला नको होते, त्यानंतर त्यांनी हद्दच केली. गिरणी कामगारांचा मुलगा आहे म्हणून कांगावा केला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Nationalist Congress President Sharad Pawar) यांनी  केली.  

 पवार म्हणाले की,  चंद्रकांत पाटील यांनी कांगावा करत आपण सामान्य कुटुुंबातून आलो आहोत म्हणून हे सगळे सुरू आहे, असे  राज्याच्या राजकारणात पहिल्यांदा  नाही.तुम्ही  ५ वर्षे मंत्रिमंडळात मंत्री होता.  पक्षाचे अध्यक्षही  होता आणि आताही मंत्री आहात आणि एखाद्या सामान्य कुटुुंबामधील व्यक्ती ही सत्तेच्या शिखरावर जाते ही काही केवळ तुमच्या बाबतीत  घडलेली नाही, आहि अनेक उदाहरणे महाराष्ट्रात देता येतील, असा टोलाही त्यांनी लगावला.मात्र, शाईफेक करणे ही भूमिका आपण कधी घेणार नाही. आपणही अशी भूमिका घेऊ नये, असे आवाहन त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले.(Sharad Pawar: The words used by Chandrakant Patlani should not have been used!)

पंतप्रधान मोदींवर टीका

शरद पवार म्हणाले की, राज्यकर्त्यांनी आपण देशाचे नेतृत्व करतोय याची जाणीव ठेवायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मात्र, सरकारी कार्यक्रमात त्यांनी एखाद्या पक्षाचे नेते म्हणून नाही, तर देशाचे पंतप्रधान म्हणून करायला हवे. निवडणुकीच्या प्रचाराला गेले  तरीसुद्धा नेहरूंनी विरोधकांवर टीका केली नाही. विरोधक ही लोकशाहीची संस्था आहे. हे  सूत्र आजवर सर्व पंतप्रधानांनी पाळले. मात्र, आज हे सूत्र पाळले जात नाही  असा टोला शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *