Sharad Pawar: President's rule was lifted due to morning oath taking, Uddhav Thackeray became Chief Minister!

Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली,  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले!

पुणे ।तब्बल तीन वर्षांपूर्वी पहाटेच्या वेळी झालेल्या शपथविधीचा मुद्दा भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी नुकताच  उपस्थित केला मात्र , त्याचे खंडन करताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar )  यांनी फडणवीस असे काही स्टेटमेंट करतील असे वाटले नव्हते असे भाष्य केले. एकीकडे त्यावरील चर्चेला पूर्णविराम मिळत असताना आता शरद पवारांनी    पहाटेच्या शपथविधी प्रकरणी संपूर्ण माहिती असल्याची कबुली दिली आहे. 

  पहाटेच्या शपथविधी प्रकरणी  अजित पवारांनी (Ajit Pawar) बोलण्याची काय गरज आहे?, तो केवळ सरकार बदलायचा प्रयत्न झाला. पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली, त्यामुळेच उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray )  मुख्यमंत्री झाले, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
पवार म्हणाले की, अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर बोलण्याची काय गरज आहे. समजने  वाले को इशारा काफी है, असं म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या आपल्याला पहाटेच्या शपथविधीबाबत माहिती असल्याचे मान्य केले  आहे. पहाटेचा शपथविधी ही राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीची खेळी होती, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांनी याआधी म्हटले होते की, मला वाटले देवेंद्र हा सुसंस्कृत, सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते असे स्टेटमेंट करतील, असे मला कधी वाटले नव्हते. यानंतर त्यांनी  अप्रत्यक्ष कबुली दिली आहे.

 …  3 वर्षांनंतर हा गौप्यस्फोट का केला 

महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेने भाजपशी फारकत घेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्याच वेळी देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी सर्वांना धक्का देत 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र शरद पवारांनी लगेच सूत्रे हलवल्यामुळे हे सरकार 72 तासांत कोसळले. पण शपथविधीचा चमत्कार कसा घडला हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

तब्बल 3 वर्षे 2 महिन्यांनी देवेंद्र यांनी याबाबत गौप्यस्फोट केला. ‘ते अजित पवारांचे बंड नव्हते, तर शरद पवारांशी चर्चा करूनच सारे ठरले होते. पण नंतर या गोष्टी बदलल्या,’ असे देवेंद्र म्हणाले. शरद पवारांनी मात्र त्याचे खंडन केले. मात्र देवेंद्र यांनी 3 वर्षांनंतर हा गौप्यस्फोट का केला याची आता चर्चा होत आहे. (Sharad Pawar: President’s rule was lifted due to morning oath taking, Uddhav Thackeray became Chief Minister!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *