NCP President Sharad Pawar called on Prime Minister Narendra Modi. The meeting took place at the Prime Minister's Office in Parliament. In the press conference held after this meeting, Sharad Pawar gave information about the meeting. 'We met Prime Minister Narendra Modi to discuss various issues of Lakshadweep. On this occasion, Lakshadweep MP Mohammad Faizal P.P. Were also present. Sharad Pawar informed that various issues of Lakshadweep were discussed at this time. He also said that during the meeting, the issue of 12 MLAs of the Legislative Council was discussed and Narendra Modi would take appropriate decision after considering it.

Sharad Pawar : ‘या’ मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींशी चर्चा

नवी दिल्ली ।राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  (NCP President Sharad Pawar) यांनी   पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Prime Minister Narendra Modi) भेट घेतली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली.  या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी भेटीसंदर्भातील माहिती दिली. ‘लक्षद्वीपच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल पी.पी. देखील उपस्थित होते. यावेळी लक्षद्वीपच्या विविध मुद्यांवर चर्चा झाल्याची  माहिती शरद पवार यांनी दिली. तसेच या भेटीदरम्यान, विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या प्रश्नावर चर्चा झाली असून नरेंद्र मोदी  विचार करून योग्य निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.

यावेळी शिवसेना नेते खासदार  संजय राऊतांवरील कारवाई   करण्याची काय गरज होती, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केले.प्रफुल्ल के पटेल यांना दादरा नगर हवेली आणि दमण दीवचा कार्यभार देण्यात आला होता. त्यानंतर त्यांना लक्षद्वीपचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. त्यांच्या नियुक्तीनंतर लक्षद्वीपला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या १५ महिन्यांपासून तेथे भूसंपादनाचा मुद्दा गाजत आहे. तेथील बहुतेक लोक नोकऱ्यांवर अवलंबून आहेत. मात्र, पटेल यांनी 2400 कर्मचारी-अॅडहॉक तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे, त्यामुळे या मुद्यांवर प्रामुख्याने चर्चा झाली असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. तसेच यावेळी विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या प्रश्नावर चर्चा झाली असून नरेंद्र मोदी विचार करून योग्य निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
 
… चर्चेलाही पूर्णविराम
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावरील कारवाईच्या मुद्यावरही प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांच्यावर अन्याय झाला असून या कारवाईची गरजच काय होती? असा सवालही पवारांनी उपस्थित केला. तसेच भाजपाशी आमचा काहीही संबंध नसून राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र भाजपशी लढणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी शरद पवार यांनी युपीएच्या अध्यक्षपदाच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला. युपीएच्या अध्यक्षपदाची  जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार नसल्याचे ते म्हणाले. 

7 thoughts on “Sharad Pawar : ‘या’ मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींशी चर्चा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *