Deputy Chief Minister Devendra Fadnavis has smashed 22 Congress MLAs. Shiv Sena's Thackeray faction MLA Chandrakant Khaire claimed that he is calm because of the Congress Jodo Yatra, so there is no excitement in the political circles, Khaire did 'ghumjaav', but the question of whether there will be a resurgent politics has now become a topic of discussion in the political circles and Shinde If the group's 16 MLAs are disqualified, this has been done by Devendra Fadnavis as an alternative from the BJP as a 'hint' of power. Therefore, when the Bharat Jodo Yatra is entering Maharashtra, everyone's attention is focused on whether it is possible to 'leave the Congress' or not.

SattechaSaripat: आधी दावा मग ‘घुमजाव’ ;’महाशक्ती’ कडून पुन्हा ‘फोडाफोडी’

औरंगाबाद ।उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसचे २२ आमदार फोडले (smashed 22 Congress MLAs)आहेत. सध्या काँग्रेस जोडो यात्रेमुळे ते शांत आहेत, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडत नाही तोच खैरे यांनी ‘घुमजाव’ ही केले मात्र  पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण रंगणार का, हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात (Politics of Maharashtra) चर्चेचा विषय ठरला असून शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरले तर सत्तेची ‘तजवीज’ म्हणून हा खटाटोप भाजपकडून (BJP)पर्यायाने देवेन्द्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात दाखल होत असताना ‘काँग्रेस छोडो’ साध्य होते कि नाही याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

  शिवसेना पक्ष फोडण्यात भाजपला यश आले.  एक-दोन नव्हे, तर तब्बल चाळीस आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आणि  राज्यात सत्तांतर घडले. त्यानंतरही ‘फोडाफोडा’ची चर्चा अजूनही सुरूच आहेत. त्यात  शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी   प्रसारमाध्यमांशी बोलताना  असा दावा केला आहे की, सरकार पडू नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत. शिंदे गटाचे १६ आमदार जातील. मात्र, त्यानंतर आपला मुख्यमंत्री कसा करायचा याची तयारी आमचे  जुने मित्र देवेंद्र फडणवीसांनी करून ठेवली आहे मात्र  काँग्रेसची मोठी भारत-जोडो यात्रा सुरू आहे. त्यामुळे ते शांत राहिले आहेत. असा दावा खैरे यांनी केला.

खैरेंच्या या वक्तव्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी   समाचार घेतला आहे. उलट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खैरेंना स्वतःचा पक्ष सांभाळा असे उत्तर दिले आहे. तर सतेज पाटील यांनी खैरेंनी आपले विधान मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे. त्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी कुणाची मने दुखावली असतील, तर दिलगिरी व्यक्त करत वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटले आहे. मात्र, खरेच शिंदे यांनी उल्लेख केलेली ‘महाशक्ती’ पुन्हा असा प्रयोग करणार का, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

 ‘ हे’ पण पडतील…

 शिंदे यांचे चाळीस आमदार निवडून येणार नाहीत. भुजबळांसारखा माणूस पडतो. नारायण राणेंसारखा माणूस पडतो. मग हे कोण आहेत. आज त्यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. आता पैसा गौण आहे. शेवटी लोक पाहतात कोणी खोके घेतले, कोणी काय केले ते. ठाण्यात ताकद होती तर आमचे ठाण्याचे सरकार त्यांच्याकडे का गेले नाहीत. अनेक ठिकाणी मुख्यमंत्री पडले आहेत. हे पण पडतील, असा दावाही खैरे यांनी केला आहे.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *