मुंबई। एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून सुरक्षा कशी मिळते?असा परखड सवाल शिवसेना नेते (Shiv Sena leader MP Sanjay Raut) खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
भाजप (BJP) नेते किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) बोलताना संजय राऊत म्हणाले, आयएनस विक्रांतचा (INS Vikrant scam) घोटाळा हा 58 कोटींचा झालेलाच आहे. पैसे गोळा करुन त्याचा अपहार झालेलाच आहे. खरं म्हणजे ज्या परिस्थितीत त्यांची अटक टाळण्याचा प्रयत्न झालेला आहे. मी पाहतोय या सगळ्या गोष्टींकडे. गेल्या काही महिन्यापासून एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा द्यायची जी काही प्रथा सुरु आहे हा एक गंभीर प्रकार या देशात सुरु आहे, महाराष्ट्रात सुरु आहे. याकडे राऊत यांनी लक्ष वेधले.शिवाय असे दिलासे महाविकास आघाडीच्या नेत्यांना का मिळत नाही. त्यांना अटकेपासून संरक्षण का मिळू नये? हा प्रश्नही उपस्थित केला.
एका विशिष्ट पक्षांचे, विचारांचे आणि भूमिकांचे लोकं त्यांनाच अशाप्रकारे संरक्षण का मिळतंय? त्यामुळे आरोपीने कोणत्या परिस्थितीमध्ये हा जामीन मिळवलाय. याबाबत लोकांच्या मनात शंका आणि संभ्रम आहे.असेही ते म्हणाले. शिवसेना,( SHIVSENA) काँग्रेस (CONGRESS) किंवा राष्ट्रवादी ( NCP ) असेल इतर सामान्य लोकं असतील ते सुद्धा अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये तुरुंगात आहेत. घोटाळा 58 रुपयांचा असो अथवा 58 कोटींचा.. अपहार हा अपहार असतो.
मोठ्या-मोठ्याने टीव्हीसमोर येऊन बोलल्यामुळे तुमचे आरोप धुवून निघत नाहीत. यापेक्षाही भयंकर प्रकरण समोर येणार आहेत भविष्यात. जे स्वत: शेण खातात आणि दुसऱ्यांच्या तोंडाला वास घेतात त्यांचं आता पितळ उघडं पडलेलं आहे.’ अशी घणाघाती टीकाही शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर केली आहे.