मुंबई।शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानतर आता कारागृहात असलेले शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut)यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. नवीन चिन्हच शिवसेनेसाठी (Shiv Sena) क्रांती घडवेल. आमच्यात शिवसेनेचे स्पिरीट आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी संपत आहे. त्यामुळे त्यांना ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांशी औपचारिक संवाद साधताना त्यांनी शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली.
शिवसैनिकांना संजय राऊत म्हणाले, एखाद्या पक्षाचे चिन्ह गेल्याची ही पहिलीच वेळ नाही. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधीही अशाच परिस्थितीतून पुढे गेल्या होत्या. त्यांचे चिन्ह तर तीन वेळा बदलले होते. जनसंघालाही या परिस्थितीचा सामना करावा लागला. हे काही नवीन नाही. आता नवीन चिन्हच शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. नावात काय आहे? खरी शिवसेना कुणाची हे सगळ्यांना माहित आहे. तसेच, आपल्यात शिवसेनेच स्पिरीट आहे, असेही शिवसैनिकांना उद्देशून राऊत म्हणाले. संजय राऊत म्हणाले, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिंदे गटालाही शिवसेनेचे नाव व पक्षचिन्ह आता वापरता येणार नाही. मात्र, या संघर्षामुळे भविष्यात आपण आणखी सक्षम होऊ असेही ते म्हणाले. (Sanjay Raut: The new symbol will revolutionize the Shiv Sena)