Don't pay too much attention to Raj Thackeray and don't even give him importance. Yogi Adityanath was frequently mentioned by Raj Thackeray as a thug, Taklu. Now, all of a sudden, he has started feeling respect for Yogi Adityanath. He also clarified that we did not make personal criticisms even though we opposed them. In an exclusive interview given to this news channel till today, MP Sanjay Raut gave strong views on various issues including Bhonge and Hanuman Chalisa, the issue of Hindutva.

Sanjay Raut on Raj Thackeray:ठग,टकलू उल्लेख करणाऱ्यांना आता योगींबद्दल आदर!

मुंबई ।राज ठाकरेंकडे (Raj Thackeray)  फार लक्ष देऊ नका आणि त्यांना महत्त्वही  देऊ नका. योगी आदित्यनाथांचा उल्लेख ठग, टकलू असा राज ठाकरेंनी वारंवार केला होता. आता अचानक त्यांना योगी आदित्यनाथ (feeling respect for Yogi Adityanath)यांच्याविषयी आदर वाटू लागला आहे.अशी रोखठोक भूमिका मांडताना शिवसेनेचे (SHIVSENA)नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी  योगी आदित्यनाथ हिंदू धर्मासाठी काम करत आहेत, विकासाचे  काम करत आहेत. आम्ही त्यांचा विरोध करत असलो तरीही व्यक्तीगत टीका आम्ही केली  नाही असेही स्पष्ट केले. 

आजतक या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत  खासदार संजय राऊत यांनी भोंगे आणि हनुमान चालीसा, हिंदुत्वाचा मुद्दा यासह विविध मुद्द्यांवर परखड मते मांडली. विशेषतः महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून भोंगे आणि हनुमान चालीसा यांचे  राजकारण तापले  आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यसरकारला ‘डेड लाईन ‘ दिली आहे. तशी  घोषणाही ठाकरे यांनी  केली आहे. त्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा मातोश्री समोर म्हणणार असे आव्हान दिले  होते.दोन दिवस यावरून राजकीय वातावरण पेटले होते. त्यानंतर त्यांना अटक झाली. 
ज्यांचा पक्षच ‘डेड’ झाला आहे त्यांच्या ‘डेडलाईन’ला काय अर्थ?
राज्यसरकारला मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरे यांनी दिलेल्या ‘ डेडलाईन’ वर संजय राऊत यांनी थेट निशाणा साधला. ते म्हणाले, ज्यांचा पक्षच ‘डेड’ झाला आहे त्यांच्या ‘डेडलाईन’ला काय अर्थ आहे? त्यामुळे राज ठाकरेंना महत्त्व देण्याची गरज नाही.हिंदुत्वाची माहिती मिळालेले हे नवे हिंदू आहेत. आम्ही जेव्हा हिंदुत्वाचा नारा दिला होता.  त्यावेळी हे देशात इतर प्रश्न नाहीत  का? असा प्रश्न विचारत होते. यांचे  एक दुकान चालले  नाही.त्यातून  हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणला गेला आहे. त्यांना भाजपने (BJP) पूर्ण पाठिंबा दिला आहे. हिंदू ओवेसी तयार करून आमची मते  कुणी खाईल आणि आमचे  नुकसान करेल असे कुणाला वाटत असेल तर त्यांनी गैरसमज काढून टाकावा असेही संजय राऊत यांनी नमूद केले.
त्यांनी नवं हिंदुत्व स्वीकारले … 
भोंग्यावरून उद्भवलेल्या वादावर ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाने प्रार्थना स्थळांबाबत जे निर्देश दिले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सगळे व्यवस्थित  सुरू आहे. आम्ही कोणताही नियम मोडलेला नाही. नियम मोडला की कारवाई होते हे लोकांना माहित आहे.राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर भाष्य करताना  (Sanjay Raut’s Commentary on Raj Thackeray:)संजय राऊत म्हणतात कि, त्यांना अयोध्येला (Ayodhya) जायचे  असेल तर खुशाल जाऊ देत. अयोध्या, काशी, मथुरा सगळीकडे जाऊ देत. त्यांनी नवं हिंदुत्व स्वीकारले  आहे.   त्यामुळे त्यांना ते करणे  अपरिहार्य आहे. नव्याने मुस्लिम धर्मात आलेला माणूस दहावेळा नमाज अदा करतो, जोरात बांग देतो तसाच हा प्रकार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *