State Congress President Nana Patole has indicated that there is no doubt about the fact that the Shiv Sena-Vanchit alliance has nothing to do with the Mahavikas Aghadi. In this background, Shiv Sena leader MP Sanjay Raut has warned that we will directly talk to Rahul Gandhi about the inclusion of the underprivileged.

Sanjay Raut on Nana Patole Speech: ‘वंचित’च्या समावेशासाठी  थेट राहुल गांधींशी बोलू !

मुंबई।शिवसेना-वंचित युतीचा ( Shiv Sena-Vanchit alliance)महाविकास आघाडीशी (Mahavikas Aghadi) कोणताही संबंध नाही, असे वक्तव्य करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  ( State Congress President Nana Patole) यांनी मविआत सर्व आलबेल नसल्याचे संकेत दिले आहे . या पार्श्वभूमीवर वंचितचा मविआत समावेश करण्याबाबत आम्ही थेट राहुल गांधींशी बोलू, असा टोला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena leader MP Sanjay Raut)यांनी लगावला आहे.

वंचितबाबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले यांच्या वक्तव्यावर  पटोले यांचा उल्लेखही न करता संजय राऊत म्हणाले, याबाबत आम्ही राहुल गांधींशी चर्चा करू. राहुल गांधी याबाबत सकारात्मक असतील.मात्र संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीवरुन एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  हे भाजपचेच असल्याचे वक्तव्य केल्याने  वंचितला मविआत सामावून घेण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कितपत तयार होतील, असा पेच  निर्माण झाला आहे.त्यावरही   संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.  प्रकाश आंबेडकर यांना शरद पवारांवरील वक्तव्यावरुन पुन्हा सुनावताना  संजय राऊत म्हणाले, शरद पवार हे देश तसेच राज्याच्या राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे शरद पवारांविषयी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी शब्द जपून वापरावेत. त्यांचे हे वक्तव्य आम्हाला मान्य नाही. मविआ नेत्यांबद्दल बोलतानाही प्रकाश आंबेडकर यांनी सांभाळून बोलावे.( Sanjay Raut on Nana Patole Speech: Let’s talk to Rahul Gandhi directly for the inclusion of ‘Vanchit’!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *