मुंबई ।पत्राचाळ भूखंड घोटाळा प्रकरणात ईडीने (ED) अटक केलेल्या शिवसेनेच्या (Shiv Sena) फायरब्रँड संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ११ लाख ५० हजार रुपयांची रक्कम सापडली. मात्र त्यापैकी १० लाख नोटांच्या बंडलवर सेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde Name on Cash of 10 Lakhs)यांचे नाव असल्याचे उघडकीस आल्याने ही चौकशी आता वेगळ्या दिशेला जाण्याची शक्यता निर्माण झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हेही अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.
पत्राचाळप्रकरणी संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री बंगल्यावर ईडीने रविवारी सकाळी सात वाजता धडक कारवाईला सुरुवात केली. नऊ तासानंतर राऊत यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी आणले. त्यानंतर राऊत यांना अटक केली.
ईडीने दिवसभर केलेल्या झाडाझडतीत सुमारे ११ लाख ५० हजारांची रोख रक्कम सापडली. त्यापैकी १० लाखांच्या बंडलवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde Name on Cash of 10 Lakhs)यांचेच नाव असल्याचे ईडीच्या निदर्शनास आले. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी याबाबत खुलासा केला आहे.
संजय राऊत यांचा आवाज दाबण्यासाठी सूडबुद्धीने ही कारवाई केली. मात्र अशा कारवाईने त्यांचा आवाज दबला जाणार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिक आवाज उठवेल आणि संजय राऊत आणि शिवसेनेला न्याय देईल, असे राऊत म्हणाले.
ईडीने केलेल्या तपासणी वेळी सुमारे ११ लाख ५० हजार रुपयांची रोख सापडली. मात्र, जे पैसे सापडले ते अयोध्या दौऱ्यासाठी (Ayodhya tour)गेलेल्या आमदारांसाठी होते. सुनील राऊत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. त्यामुळे एकनाथ शिंदेही अडचणीत येण्याची शक्यता आहे.(Name on a bundle of 10 lakh notes, Chief Minister Eknath Shinde is also in trouble now)