Sanjay Raut: Hindutva traitor, Maharashtra traitor... Devendra Fadnavis is the real Chief Minister

Sanjay Raut: हिंदुत्व द्रोही, महाराष्ट्र द्रोही…. देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री

नागपूर। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी  ( Uddhav Thackeray)केलेल्या  नामांतरणाला स्थगिती का दिली? याचा जाब हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)यांना विचारला पाहिजे. कारण मुख्यमंत्री यांच्या हातात काहीच नाही. देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत. शिंदे यांना कोणते अधिकार नाहीत. सगळे अधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहेत.अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत  (Sanjay Raut)यांनी नवीन सरकारवर टीका केली. 

 नागपूरमध्ये शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत(sanjay raut)  माध्यमांशी बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने संभाजीनगर आणि धाराशिव हे नाव बदलण्यासह एकूण पाच निर्णय घेतले होते. हे निर्णय जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे   यांनी घेतले असले तरी ही भाजपची (BJP)अनेक वर्षांपासून मोर्चे काढून नाव देण्याची मागणी होती. आता जर हे निर्णय सरकार मागे घेत असेल, तर ते   हिंदुत्व द्रोही (traitors to Hindutva) , महाराष्ट्र द्रोही आहेत. या निर्णयाला स्थगिती देणारे शिंदे आणि फडणवीस हे ढोंगी सरकार आहे. मुळात हे सरकार बेकायदेशीर पद्धतीने निर्माण झाल्याने यांना हा निर्णय फिरवण्याचा अधिकार नाही.
लोकांच्या भावना होत्या म्हणून उद्धव ठाकरे सरकारने निर्णय घेतला  होता. आर्थिक निर्णय समजू शकतो.  बुलेट ट्रेन विषयी निर्णय समजू शकतो. पण, औरंगाबादचे संभाजीनगर नामांतरणाचा निर्णय मागे घेतला गेला आहे. मग औरंगजेब केव्हापासून नातेवाईक झाला? असा प्रश्न  राऊत यांनी उपस्थित केला. उस्मान कोण लागतात, कोर्टची टांगती तलवार सरकारवर असल्याने डोकं बधिर झाले आहे, त्यामुळे स्थगिती देत आहेत.असेही ते म्हणाले. (Sanjay Raut: Hindutva traitor, Maharashtra traitor… Devendra Fadnavis is the real Chief Minister)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *