नागपूर । नीरव मोदी, विजय मल्ल्या यांना भारतात आणणे कठिण झाले आहे अशा शब्दात भाजपवर टीका करताना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Thackeray group leader MP Sanjay Raut) यांनी विरोधकांवर खोटेनाटे आरोप करुन जेलमध्ये टाकले जात आहे. सीबीआय-ईडीचा वापर करुन राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्याचा भाजपचा डाव ( BJP’s plot to break NCP using CBI-ED)असल्याचा गंभीर आरोप केला.
ते नागपूरमध्ये बोलत होते. यावेळी संजय राऊत म्हणाले, पुलवामा हल्ल्यामध्ये निवडणुका जिंकण्यासाठी गडबड करण्यात आली . पुलवामा हल्ल्यावेळी आरडीएक्स पोहोचले कसे. राजकीय प्रचाराचा भाग म्हणून या हत्यांचा फायदा घ्यायचा होता. निवडणुका आल्या की भारत पाकिस्तान सारखा मुद्दा उपस्थित करायचा आणि निवडणुका जिंकायच्या. असा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र त्यांना त्यावेळी देशद्रोही ठरवण्यात आले.
आता विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा भाजपचा डाव आहे. नागपूरला संस्कृती आणि संस्कार होता. संघाचे मुख्यालय, मोठमोठे साहित्यिक याठिकाणी होऊन गेले. नागपूर असे कधीही नव्हते. नागपूरची हवा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याठिकाणी विकास दिसतो तसे सूडाचे इमले सुद्धा दिसत आहेत.याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
नागपूरमध्ये यापुढे महाविकास आघाडीच प्रत्येक निवडणुकीत जिंकणार. अमित शहा मुंबईत बसून सभा पाहतील. त्यांनी ती पाहायलाच हवी. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहिल. मुंबईवर शिवसेनेचा पगडा कायम आहे. कितीही रणनिती आखल्या तरी ते काहीही करु शकणार नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.