मुंबई। सामनाच्या रोखठोक सदरात मी चुकीचे काहीही बोललेलो नाही. स्वत: शरद पवार ( Sharad Pawar)हेच विरोधी पक्षातील आमदारांवर दबाव टाकला जात असल्याचे म्हणत आहेत. त्यांनी स्वत: ईडीच्या गैरवापराबाबत ( misuse of ED) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) व पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) यांना पत्र दिले आहे. तेच मी सामनामध्ये लिहिले तर चुकीचे काय? मी शरद पवारांचे ऐकतो. इतर कुणी माझ्या विश्वासार्हतेवर शंका घेत असेल तर त्याला उत्तर देण्यास मी बांधील नाही. मी यापुढेही लिहित राहणार, बोलत राहणार, कोणाला टोचत असेल तर मी काय करू? अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Thackeray group leader Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तरादाखल विरोधी पक्षनेते अजित पवारांना(opposition leader Ajit Pawar) सडेतोड उत्तर दिले आहे.
शिवसेना फुटली तेंव्हा तुम्ही आमची वकिली करत होतात. आता मी मविआची वकिली केली म्हणून माझ्यावर खापर का फोडत आहात?, असा सवालही ठाकरे संजय राऊत यांनी अजित पवारांना केला आहे. तसेच, अजितदादांनीच भाजपचा काय डाव आहे?, हे स्पष्ट करुन सांगावे, असे आवाहनही राऊत यांनी केले आहे.
इतर पक्षाच्या प्रवक्त्याने राष्ट्रवादी काँग्रेसची वकिली करू नये, अशा शब्दात अजित पवारांनी संजय राऊतांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याला पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत म्हणाले, मी मविआचा चौकीदार आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्ष मजबूत रहावा, ही आमची इच्छा आहे. त्यावर आमच्याच घटक पक्षाचे नेते खापर फोडत असतील तर गंमत आहे.
मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे ऐकतो. इतर कुणी माझ्या विश्वासार्हतेवर शंका घेत असेल तर त्याला उत्तर देण्यास मी बांधील नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात विरोधकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीची धाड टाकून त्यांच्यावर भाजपमध्ये येण्याचा दबाव टाकला जात आहे. हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखी कितीतरी उदाहरणे मी देऊ शकतो. महाराष्ट्रात असे घडते आहे की नाही, हे स्वत: अजित पवारांनी सांगण्याची आता गरज आहे.