news ncp pune Sadanand Shetty Prashant Jagtap upcoming Pune municipal elections

‘सदानंद शेट्टी हे  ठरवतील, ते उमेदवार निवडून आणा’

पुणे |आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार, पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशाने स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी पक्षाचे शहर उपाध्यक्ष  सदानंद शेट्टी यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना तीन तिकिटे दिली जाणार असून ते   पक्षाला दणदणीत विजय मिळवून देतील असा ठाम विश्वास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.  सदानंद शेट्टी हे तीन उमेदवार ठरवतील,त्यानुसारच सर्व निर्णय होईल असेही जगताप यांनी स्पष्ट केले. 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री   शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी पक्षाचे शहर उपाध्यक्ष   सदानंद शेट्टी यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी मायेचा आधार या उपक्रमांतर्गत मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर, लसीकरण ओळखपत्र – श्रमिक कार्ड नोंदणी व वाटप , डोळे तपासणी, चष्मे वाटप, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जगताप बोलत होते. यावेळी माजी आमदार जयदेव गायकवाड , माजी उपमहापौर डॉ. शंकरराव तोडकर, पुणे शहर उपाध्यक्ष   चंद्रशेखर धावडे, कॅन्टोन्मेंट विधानसभा महिला अध्यक्षा मिना  पवार, युवक अध्यक्ष   महेश हांडे, अमर कोरे, इकबाल शेख, मंगेश साखरे, महंमद शेख, अक्षय गायकवाड,नुरुद्दीन अन्सारी, अमोल शेंडगे, विशाल शिंदे यांच्यासह सदानंद शेट्टी मित्र परिवाराचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की, या कसबा -कॅंटोन्मेंट या दोन विधानसभा मतदारसंघात सदानंद शेट्टी यांच्यामुळे राष्ट्रवादीची ताकद निश्चित वाढणार आहे. पक्षश्रेष्ठी यांच्या आदेशाने सदानंद शेट्टी यांना तीन तिकिटे देण्यात येणार आहे. त्यांनी चांगले उमेदवार देऊन, त्यांना निवडून आणावे. असेही ते म्हणाले. यावेळी सदानंद शेट्टी म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री ना. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विविध उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ , रास्ता पेठ आणि परिसरातील नागरिकांनी मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर, लसीकरण ओळखपत्र – श्रमिक कार्ड नोंदणी व वाटप , डोळे तपासणी, चष्मे वाटप या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. या भागात प्रथमच असा उपक्रम झाला आहे, अन्य पक्षांनी आजवर घेतलेला नाही. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून आम्ही   शरद पवार साहेब यांचा वाढदिवस साजरा केला, या उपक्रमाचे नागरीकांनी कौतुक केले आहे . गोरगरीब नागरिकांसाठी आरोग्य विषयक उपक्रम राबविणे हे अत्यंत गरजेचे आहे.  आजवर मी आणि कार्यक्षम नगरसेविका सौ. सुजाता सदानंद शेट्टी आम्ही दोघांनी महापालिकेत प्रतिनिधित्व करताना नागरिकांच्या हितालाच सदैव प्राधान्य दिले आणि यापुढेही देणार आहोत. विकासासाठीच कटिबद्ध आहोत. 
 
 
फसवणूक करणाऱ्यांना आता    धडा  शिकवू या!
 
 प्रभागाला, मतदारसंघाच्या  विकासाला  भरीव निधी मिळेल, नागरिकांचे जगणे आणखी सुसह्य होईल, त्यांना मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध होतील यासाठी मी भाजपमध्ये गेलो.माझ्या आवाहनानुसार आपण भाजपच्या उमेदवाराला निवडून दिले;  पण त्यांनी विकासासाठी दिलेला शब्द पाळला  नाही, त्यांनी आपली फसवणूक केली. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याची  ती माझ्या आयुष्यातील मोठी चूक होती. त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो.असे राष्ट्रवादी पक्षाचे शहर उपाध्यक्ष श्री. सदानंद शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले आणि   नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांना आता  आपण धडा  शिकवला पाहिजे  हा  निर्धार करून आपण राष्ट्रवादीचे जे उमेदवार असतील,त्यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणू या. असे आवाहनही त्यांनी केले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *