जालना|
तिरूपतीमधील न्हावी डोक्यावर दोन-दोन वस्तारे हाणून ग्राहकांना बसवून ठेवतात. तसेच, काम महाविकास आघाडीचे झाल्याची टीका रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याविरोधात नाभिक समाज आक्रमक झाला आहे.त्यातूनच त्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यातील मामा चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी रावसाहेब दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्यांना21 हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारची अवस्था तिरुपती येथील न्हाव्यांसारखी झाली आहे. तिरूपतीमधील न्हावी डोक्यावर दोन-दोन वस्तारे हाणून ग्राहकांना बसवून ठेवतात. तसेच, काम महाविकास आघाडीचे झाल्याची टीका केली होती. दानवे यांनी केलेल्या या वक्तव्याच्या निषेधार्थ मामा चौकात नाभिक समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी दानवेंच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले.नाभिक समाजाच्या आंदोलकांनी हातात काळ्या रंगाचे झेंडे घेऊन दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, दानवे यांची अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याण दळे यांनी केली. दानवे यांनी नाभिक समाजाची माफी मागावी अन्यथा उग्र आंदोलन करू, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.