सातारा।मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला (MNS)बरोबर घेतल्यास मनसेमुळे परप्रांतीयांची मते मिळणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपने (Eknath Shinde group and BJP)मनसेला बरोबर घेऊ नये. शिंदे गट सध्या आरपीआय आणि भाजपबरोबर असल्यामुळे मनसेची गरज नसल्याची स्पष्ट भूमिका केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मांडली आहे.
यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही खोचक टीका केली. ते म्हणाले, ज्यांना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार. भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) भारत तोडो यात्रा संबोधत काँग्रेस पक्षाची अवस्था गलितगात्र झाली असल्याचा हल्लाबोलही आठवलेंनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी सगळा भारत जोडला आहे. राहुल गांधींना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार? पंतप्रधान नरेंद्र मोंदीचा सामना करणे हे राहुल गांधींचे काम नाही. नरेंद्र मोदींशी सामना करणारा देशात सध्या दुसरा कोणीही नेता नाही. बिहारचे नेते नितीशकुमार हे मोदींच्या विरोधात विरोधकांना भेटत असले तरी मोदींशी सामना करणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. जेवढे विरोधक एकत्र येतील तेवढा मोदींनाच फायदा होईल, असा टोला आठवलेंनी विरोधकांना मारला.(Ramdas Athawale: There is no need for MNS as Shinde group is with RPI-BJP)