Raj Thackeray's open offer: Young people , I am ready to work with you!

Raj Thackeray’s open offer:तरुणांनो राजकारणात या,मी तुमच्यासोबत काम करायला तयार!

पुणे ।मुळ प्रश्न सोडावायचे असेल तर राजकारणात यायलाच हवे. नुसते घरात बसून राहू नका. घरात बसून बोटे मोडणे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. माझी विनंती आहे की, राजकारणात (politics)या. राजकारणात विविध अंग असतात. माझी इच्छा आहे की, तुम्ही राजकारणात यावे. कुणाची इच्छा असेल तर आपण जरुर मला येऊन भेटावे. मी तुमच्यासोबत काम करायला तयार आहे. (I am ready to work with you)  अशी खुली ऑफरच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray’s open offer) पुण्यात तरुणांना दिली. 

पुण्यात सहजीवन व्याख्यानमालेत  ‘नवं काहीतरी’ याविषयावर   राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी राजकारण, महाराष्ट्र  (politics and Maharashtra)यावर भाष्य केले.राज ठाकरे म्हणाले, क्रांतिकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी राजकारणात यायला हवे. या क्षेत्रात यायला कुठलीही बंधने नाहीत. वारसा- फिरसा लागतो, ते साफ खोटे आहे. वारसा असलेले राजकारणी त्यांचे मुले – मुली राजकारणात आणू शकतात; पण लादू शकत नाही.असेही ते म्हणाले.  ​​

आपल्यात सुज्ञपणा नसेल तर सुशिक्षित असून काय फायदा. वीजेसह इतर गोष्टींचे दर जनता नाही, तर राजकारणी ठरवत आहेत. शाळेचा अभ्यासक्रम सरकार, प्रशासन ठरवते. तुम्ही निमुटपणे सहन करता तुम्ही जाब विचारत नाही. या परिस्थितीत अनेक तरुण- तरुणी कंटाळतात व ते परदेशात जातात. तुमचे गप्प राहणे, तुमचा सहभाग राजकारणात नसणे यामुळे आजुबाजूचा परिसर, वातावरण बरबाद होत आहे.याकडेही राज ठाकरे यांनी लक्ष वेधले.

…कुठे महाराष्ट्राला नेत आहोत

राज ठाकरे म्हणाले, राजकारण वाईट नाही. तुमच्या आयुष्याशी निगडीत, पिढ्यांच्या भविष्यांशी निगडीत राजकारण वाईट नाही. राजकारण चुकीच्या लोकांच्या हातात पडतेय. राजकारण नासवण्यात येत आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र युपी, बिहारसारखा जातीपातीत बरबाद होत असेल तर कुठे महाराष्ट्राला नेत आहोत आपण याचा विचार करण्याची गरज आहे.असेही ते म्हणाले. (Raj Thackeray’s open offer: Young people , I am ready to work with you!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *