पुणे ।’अशी वेळ कोणावरही येऊ नये, उद्धव साहेब ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला (Uddhav Saheb Thackeray’s visit to Ayodhya) आणि श्री राम मंदिराला विरोध करून व्यंगचित्र काढणारे राज ठाकरेंना (Raj Thackeray) शेवटी अयोध्येत जाणार आहेत. ‘सोयीनुसार आणि सुपारी नुसार पोकळ हिंदुत्व…’ अशी खोचक टीका शिवसेनेकडून (SHIVSENA) करण्यात आली आहे.
पुण्यात (PUNE) थेट मनसेचे ( MNS president) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे या बॅनर्समध्ये राज ठाकरे यांनी स्वत:चे काढलेले व्यंगचित्र दाखवण्यात आले असून ‘अशी वेळ कोणावरही येऊ नये’ असा उल्लेख करण्यात आला आहे. हे बॅनर्स कोणी लावले हे अजून स्पष्ट झालेले नसले तरी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांनाच त्या दौऱ्यावर जाण्याची वेळ आली आहे. सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व, असे या फ्लेक्सवर लिहिण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्याच रेखाटलेल्या व्यंगचित्राची आठवण करून देणारे फ्लेक्स शहरातील विविध भागात लावण्यात आल्याने सध्या शहरात या फ्लेक्सचीच चर्चा सुरू आहे.राज ठाकरेंचं त्यावेळचे व्यंगचित्र बुमरँग झाल्याचेच अधोरेखित झाले आहे.
राज्यात मशिदीवरील भोंगे आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर राज ठाकरे सध्या आक्रमक झाले आहेत. अयोध्या दौऱ्यावर जाण्याची राज ठाकरे यांनी घोषणाही केली. पण ,ज्या अयोध्यावरून राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.नेमके योग्य वेळ साधत शिवसेनेने त्याच राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यामुळे राज ठाकरेंचे व्यंगचित्र मनसेवर बूमरँग (boomerang) झाले आहे.
गुढीपाडव्या मेळाव्यापासून राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास धरली आहे. मशिदीवरील भोंगे असो किंवा हनुमान चालीसा पठणवरून मनसे आक्रमक झाली आहे. एरवी भगवी शाल कधीही परिधान न करणारे राज ठाकरे पुण्यात केलेल्या महाआरतीवेळी भर ३८-३९ डिग्री तापमानात शाल पांघरलेले पाहायला मिळाले. त्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना हिंदू जननायक अशी पदवीही बहाल केली आहे. अनेक ठिकाणी तसे बॅनर लावण्यात आले. येत्या ५ मे रोजी राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावरून शिवसेनेनेही राज ठाकरे यांनीच काढलेल्या व्यंगचित्रातून टीका केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले असताना, राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून ‘आसूड’ ओढला होता. हेच व्यंगचित्र शिवसेनेने आता व्हायरल करत मनसेला फटकारले आहे.
काय होते त्यावेळचे व्यंगचित्र आणि मजकूर…
‘अहो, देश खड्ड्यात घातला आणि आता माझ्या नावाने गळा काढत आहात! लोकांनी तुमच्याकडे (People had asked you for ‘Ram Rajya’. Not ‘Ram Mandir’ …!) ‘राम राज्य’ मागितले होते. ‘राम मंदिर’ नव्हे…! या व्यंगचित्रातून एका बाजूला राम लक्ष्मण चिंताग्रस्तेत तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या व्यक्तीरेखा साकारून टीकास्त्र (Raj Thackeray’s cartoon boomerang) सोडले होते.