Raj Thackeray: Closed door discussion with Chief Minister Eknath Shinde

Raj Thackeray: ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!

मुंबई ।आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’  अशा शब्दात  टीका करत मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)   यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  यांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.

 एक ट्विट करून राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi government) लक्ष्य केले आहे. राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे (horns on mosques) उतरवण्याच्या मागणीवरुन चांगलाच वाद पेटला आहे. आरोप प्रत्यारोपांसह कलगीतुरा पहायला मिळत आहे. त्यात  राज ठाकरे यांनी सरकारला 3 मेपर्यंतचा वेळ महाविकास आघाडी सरकारला  दिला आहे. सरकारने या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी बैठका घेत मार्गदर्शक तत्वे जाहीर केले असले तरी  हा वाद शमलेला नाही मात्र एकीकडे महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यावरून वाद पेटलेला असताना दुसरीकडे  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी तेथील मशिदीवरचे भोंगे उतरवले आहेत;पण केवळ मशिदी नाही तर मंदिरावरील भोंगेही हटवले आहेत. काही ठिकाणी मंदिरांमध्ये लाऊडस्पीकरवर चालणारे विष्णू सहस्त्रनामही बंद केले आहेत. मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा घेऊन राज ठाकरे यांनी अयोध्या दौराही जाहीर केला आहे तसेच औरंगाबादमध्ये १ मे रोजी जाहीरसभा घेण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. एकप्रकारे राज ठाकरे  यांनी  पक्षाचे आगामी धोरण काय याचीच रूपरेषा मांडली मात्र त्यावरून राज ठाकरे आणि  मनसे समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर ‘ट्रोल’ झाला आहे. विशेषतः मशिदींवरील भोंग्यावरून मनसेवर मोठयाप्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागत असताना, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भूमिकेमुळे मनसेला दिलासा मिळाला आहे. त्यातूनच राज ठाकरे यांनी योगी  त्यांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.
काय म्हटले आहे ट्विटमध्ये … 
राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये (tweet) म्हटले आहे की,  ‘उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचे (MNS president Raj Thackeray has congratulated and thanked Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) मन:पुर्वक अभिनंदन आणि आभार.  आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *