नागपूर ।रझा अकादमीविरोधा मी मोर्चा काढला त्यावेळी बाकीचे कुठे होते असा थेट सवाल करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांनी माझ्या भूमिकेत बदल होत नाही,असे नागपूरमध्ये ठणकावून सांगितले. तसेच वेदांता-फॉक्सकॉनकडे (Vedanta-Foxconn) पैसे मागितले का. नेमके फिस्कटले कुठे, महाराष्ट्रात आलेला उद्योग बाहेर का जातो, असे सवालही केले.
राज ठाकरे म्हणाले, मराठीला नख लावले तर मराठी म्हणून अंगावर येईल. धर्मावर नख लावले तर हिंदू म्हणून अंगावर येईल. पक्षाच्या नोंदणीची टॅगलाईन मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक अशी आमची भूमिका आहे. रझा अकादमीविरोधा मी मोर्चा काढला त्यावेळी बाकीचे कुठे होते. माझ्या भूमिकेत बदल होत नाही.(Raj Thackeray: There is no change in my role)असे स्पष्ट करून उद्धव ठाकरेंनी मतदारांचा अपमान केला. अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद आले कुठून, असा सवालही केला. अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद कुठून आले. शिवसेनेचा अडीच वर्षांचा फार्म्युला युतीत ठरला होता, तर तो याधी जाहीर का नाही सांगितला. उद्धव ठाकरे व्यासपीठावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील हे सांगतात, तेव्हा उद्धव ठाकरे गप्प का होते. लोकांनी फक्त या सर्व लोकांचा खेळ बघायचा का? उद्धव ठाकरेंनी मतदारांचा अपमान केला आहे.(Uddhav Thackeray insulted the voters)
मनसेची युती अमुक पक्षाशी तमुक पक्षाशी हे मी फक्त माध्यमांमधूनच ऐकतोय. विदर्भ काँग्रेसची बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, पण आता तो भाजपचा बालेकिल्ला आहे. प्रत्येक ठिकाणी प्रस्थापितांविरोधातच लढावे लागते. राजकारण एका बाजूला आणि वैयक्तिक संबंध एका बाजूला असते. नितीन गडकरी आणि माझे जूने संबंध आहेत. पक्ष, नेत्यांच्या धोरणावर टीका होऊ शकते. धोरणांना विरोध असू शकतो पण वैयक्तिक टीका मी केली नाही.
नागपुरात पक्षात काही चुकीच्या गोष्टी सुरू होत्या. पक्षाला सोळा वर्षे झाली पण नागपूरमध्ये जसा पक्ष दिसायला हवा तसा दिसत नाही म्हणून मी पदे बरखास्त केली. नवीन लोकांना संधी मिळणार आहे. मुंबईत २७ सप्टेंबरला पक्षाची बैठक आहे त्यानंतर पदाधिकारी मुंबईहून नागपूरात येऊन पक्षबांधणी करतील. कोल्हापूरनंतर कोकणात त्यानंतर मी परत नागपूरला येईल. पक्षबांधणीवर मी लक्ष देणार आहे,असेही ते म्हणाले. तसेच हल्ली वैयक्तिक टीका घरापर्यंत शिरल्या. आघाड्या-आघाड्यातही वाद होतच असतात त्यामुळे मी नितीन गडकरींशी भेटत असेल तर त्यात आश्चर्य नाही. मुंबई, नाशिकमध्ये आमचा दबदबा आहे, पण नागपूरकडे आमच्याकडून दुर्लक्ष झाले. यापुढे होणार नाही.हेही त्यांनी नमूद केले.(Raj Thackeray: There is no change in my role)