Raj Thackeray purepolitics maharashtra politics

Raj Thackeray: … तर मी राजकारणात नालायक

खेड । निवडणुकीआधी एकासोबत आणि निवडणुकीनंतर दुसऱ्यासोबत , अशी मतदारांची प्रतारणा मी करणार नाही. मला ते जमणार नाही. निवडणुकीत एकासोबत आणि नंतर दुसऱ्यासोबत जाण्याला राजकारण म्हणत असेल, तर मी राजकारणात नालायक असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena)अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. दापोली, चिपळूण  आणि खेड येथील मनसे कार्यकर्त्यांशी राज ठाकरेंनी पक्षबांधणी संदर्भात संवाद साधला. खेडमध्ये भाषण करताना राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच खेडमधील जनता मनसेच्या उमेदवारांना नक्की साथ देतील, असा विश्वासही राज ठाकरे यांनी बोलून दाखवला. 

लोकांनी रंग बदलणाऱ्या राजकारणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी युती भावनिक आहे तर राष्ट्रवादीसोबत पुढील काळात भावनिक  होईल, असे मत व्यक्त केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे बोलत होते. जनता शांत बसल्याने राजकारण्यांना फायदा होत असल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.  राज्यातील   राजकारण किती गलिच्छ होत आहेत, हे जनतेने पाहावे. हम करे सो कायदा अशी सत्ताधाऱ्याची परिस्थिती असल्याचे राज ठाकरे म्हणाले. राजकीय नेते कसे रंग बदलतात हे देखील जनतेने पाहावे, असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी केले.

आगामी निवडणूक लढवणार

आगामी काळात होणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. या संदर्भात कालच त्यांनी स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेचे आव्हान इतर पक्षांसमोर असेल हे स्पष्ट झाले आहे.Raj Thackeray: … then I am worthless in politics

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *