Raj Thackeray: Closed door discussion with Chief Minister Eknath Shinde

Raj Thackeray: आता अक्षय्य तृतीयेला राज्यभरात भोंगे लावून महाआरत्या!

मुंबई । राज्यात सध्या भोंगे चर्चेत आहेत. सर्व मशिदींवरील भोंगे  तीन तारखेपर्यंत उतरले नाही तर येणाऱ्या परिणामांना तयार रहा, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे   यांनी दिला होता. आता हा वाद काही शांत होण्याच्या मार्गावर नाहीये. कारण याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray)  यांच्या मुंबईतील शिवतीर्थ   या निवासस्थानी आज मनसे नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत देखील याच मुद्द्यावर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 3 मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भोंगे लावून राज्यभर महाआरती (Maha Aarti) करण्याचा आदेश ‘शिवतीर्था’वरून निघाला आहे. 

 आजच्या या बैठकीबद्दल माहिती देताना मनसेचे प्रमुख नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, ‘आमचा तीन तारखेचा अल्टिमेटम आहे’, या अगोदर त्यांनी भोंगे उतरवावे.  तीन तारखेला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आम्हीदेखील संपूर्ण राज्यभर भोंगे लावून महाआरतीचे आयोजन केले आहे. याला राज्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी योग्य तो प्रतिसाद देतील.१ तारखेला महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर औरंगाबादेत राज ठाकरे यांची महासभा होणार आहे. या सभेत ‘साहेब तुम्हाला अधिकची माहिती देतीलच’ असं बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी म्हटलं आहे.
 राज ठाकरे यांनी पाच जूनच्या अयोध्या दौऱ्याबद्दल (visit to Ayodhya on June 5) आम्हाला काही सूचना केल्या आहेत. त्या सूचना लक्षात घेऊन आम्ही काही त्रुटी राहिल्या होत्या त्या भरून काढणार आहोत. त्यासंदर्भात आमची काही पदाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा बैठक होईल. हा अयोध्या दौरा अधिकाधिक प्रभावी व यशस्वी करण्यावर आमचा भर असेल असेही   नांदगावकर यांनी म्हटले आहे. 
हा दौरा अधिक यशस्वी व प्रभावशाली करण्याच्या दृष्टीने आजची बैठक पार पडली. या बैठकीला राज्यभरातून आमचे हजारो कार्यकर्ते अयोध्येत येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच आम्ही अयोध्येत जाऊन पाहणी केली. परिस्थिती अनुकूल आहे का ? याचा आढावा घेतला. त्यानंतरच आम्ही तारीख ठरवली आहे. या दौऱ्याला येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या लक्षात घेता व तिथं होणारी गर्दी बघता उत्तर प्रदेश (Uttar Pradesh)  प्रशासनाशी चर्चा करणं आवश्यकच आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात आम्ही यासंदर्भात योगी प्रशासनाशी निश्चित चर्चा करू.असे मनसे नेते नितीन सरदेसाई (MNS leader Nitin Sardesai) यांनी म्हटले आहे.
दरम्यान या बैठकीत राज ठाकरे यांच्या सुरक्षाविषयी चर्चा करण्यात आली तसेच अयोध्या दौऱ्याला महाराष्ट्रातील मनसैनिक मोठ्याप्रमाणावर येणार असल्याने त्यासाठी विशेष रेल्वे उपलब्ध होण्यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांशी संपर्क साधण्याबाबत चर्चा झाली. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *