At MNS's Gudipadwa rally, Raj Thackeray had made a serious allegation that anti-social activities were taking place in mosques and madrassas. It has been demanded that Raj Thackeray should be handcuffed under UAPA Act. Therefore, the question of the role of the BJP will be important in political circles as the central government has the power to file charges under the UAPA Act, even if there is a possibility of a MNS-deprived dispute in the near future.

Raj Thackeray: कार्यकर्त्यांना दिली शपथ

मुंबई ।

मनसेच्यावतीने दादर मधील शिवाजी पार्क येथे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray gave oath to the workers)  यांनी महाराष्ट्रात सुराज्याच्या निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू, अशी शपथ कार्यकर्त्यांना दिली आहे.

 या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मनसेचे कार्यकर्ते दादर मध्ये (MUMBAI) दाखल झालेले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी कार्यकर्त्यांना एक शपथ देखील दिली.   यावेळी   राज ठाकरे म्हणाले की आज महाराजांच्या जयंती निमित्त मी शपथ घेतो की स्वराज्याच्या उभारणीनंतर महाराजांनी जी स्वराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला. त्याला अनुसरून महाराष्ट्रात सुराज्याच्या निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू. जाती-जातीत विभागला गेलेला समाज एक रहावा यासाठी प्रयत्न करू. महिलांचा आत्मसन्मान व नागरिकांच्या सुदृढ आरोग्य यासाठी सदैव काम करू, अशी शपथ राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिली.
यावेळी राज ठाकरे यांनी लहान मुलांसोबत देखील संवाद साधला. यातील एक चिमुकला छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून आला होता. राज ठाकरे यांनी त्याची विचारपूस केली व त्याच्याशी संवाद साधला. काही तरुण रायगडावरून शिवज्योत घेऊन आले होते, त्यांच्याशीही राज ठाकरे यांनी चर्चा केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *