मुंबई । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई पर्यायाने महाराष्ट्राबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari has once again made a controversial statement) विधान केले आहे. त्यानंतर त्यांच्याविषयी टीकेची झोड उठत असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray)यांनीही एक पत्र लिहून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. मराठी माणसाला डिवचू नका असा थेट इशारा राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना दिला आहे.
राज ठाकरेंनी राज्यपालांना उद्देशून लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्याला महाराष्ट्राच्या (Maharashtra) इतिहासाबद्दल माहित नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे, म्हणून आपल्याविरूद्ध बोलायला लोक कचरतात, मात्र आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात.महाराष्ट्रातील मराठी माणसानं येथील मनं आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच इतर राज्यातील लोक इथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका इतकंच आत्ता आपल्याला सांगतो. असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या पत्राला कोश्यारींची होशियारी? असे नावही दिले आहे.
राज्यपाल कोश्यारी काय म्हणाले होते?
कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की, महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही, असे मुंबईबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एका कार्यक्रमाच्या व्हीडिओत बोलताना दिसून आले होते.