नागपूर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray:) सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी विधानभवनात (Vidhan Bhavan) जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांची भेट घेतली. या भेटीत दोघांची बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा जोरदार रंगत असून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सध्या विधिमंडळ अधिवेशन रोज एका एका मुद्यावरून गाजते आहे. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामागेही चौकशीचा ससेमिरा लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीचे महत्त्व वाढले आहे.त्यात राज्यविधिमंडळ अधिवेशनाने राजकीय वातावरण तापलेले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. फडणीस पुणे येथे आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना अचानक दिल्लीहून निरोप आल्याचे समजते. त्यांनी मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच ते तातडीने पुण्याहूनच दिल्लीला रवाना झाले. फडणवीस यांना दिल्लीहून कशासाठी बोलावणे आले, याची चर्चा मात्र सुरु झाली आहे.