Raj Thackeray: Closed door discussion with Chief Minister Eknath Shinde

Raj Thackeray: ​… पण ‘त्या’साठी मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र ​

 मुंबई​।​ अंधेरी पोट निवडणुकीसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनाही एक पत्र पाठवले आहे​. ​ राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा​,​ यासाठी हा पत्र प्रपंच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला आहे​. ​

राज्यात परतीच्या पावसामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे​. ​ त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज ठाकरे यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे​. 
 पत्रात राज ठाकरे म्हणतात की​,​ यावर्षीचा मान्सून मुक्काम वाढला​.  त्यात परतीच्या पावसाने ​कहर  केला​. ​ या परतीच्या पावसाने पिकांचे अपरिमित नुकसान केले आहे​. ((Agriculture and farmers have suffered huge losses due to return rains in the state) )​ तसेच एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबत शेतकरी बांधव चिंताग्रस्त आहेत.
ऐन  पीक काढणीच्या वेळी हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्या​देखत  पीक वाया गेले आहे​. ​ यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत​,​ हे चांगलंच आहे​;​ पण तेवढे पुरेसे नाही​. ​ सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की​,​ शेतकऱ्यांचे राज्यभर झालेले नुकसान ​हे ​इतके मोठे आहे की राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा.(Raj Thackeray: … but a letter was written to the Chief Minister for ‘that’)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *