Raj Thackeray: Closed door discussion with Chief Minister Eknath Shinde

Raj Thackeray: पोलिसांकडून सभास्थळ बदलण्याचा सल्ला,मनसेची कोंडी!

औरंगाबाद ।महाराष्ट्रदिनी 1 मे रोजी मनसेची पर्यायाने राज ठाकरेंची( Raj Thackeray)  औरंगाबादमध्ये  (Aurangabad) सभा होणार आहे. मनसेने (MNS)  या सभेसाठी जोरदार तयारी चालवली  आहे. मात्र राज ठाकरेंच्या  सभेला वंचित बहुजन आघाडीसह अनेक संघटनांनी तीव्र विरोध कायम ठेवला  आहे. या संघटनांनी पोलीस आयुक्तांना राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र पाठवले आहे. त्यात पोलिसांनीही  अद्यापही मनसेच्या सभेला परवानगी दिलेली नाही. शिवाय आता(Advice from police to change the venue)   सभेचे स्थळ बदलण्याचा सल्लाही दिला  आहे. त्यामुळे ज्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानासाठी (Marathwada cultural ground) आग्रही असलेल्या मनसेला आता कोणती तडजोड  स्वीकारावी  लागते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेसाठी स्थानिक पोलीस प्रशासन निर्णय घेणार असल्याचे यापूर्वीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यात सध्याची परिस्थिती, रमजानचा महिना आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेता स्थानिक पोलीस प्रशासनाकडून  ठाकरेंच्या सभेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मैदानाऐवजी सिडको परिसरात असलेल्या गरवारे स्टेडियममध्ये परवानगी देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. त्यात मुख्यत्वे एकच दरवाजा मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी आहे. मनसेच्या (MNS) औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेला गेल्या अनेक दिवसांपासून विरोध वाढत असल्यामुळे राज ठाकरेंच्या या सभेला गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे अनुचित प्रकार घडला, तर लोकांना त्रास होईल, याकडे  पोलिसांनी लक्ष वेधले  आहे. राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसेने तयारी सुरु केली असताना दुसरीकडे विरोधही वाढत  आहे.   अनेक संघटना दररोज पोलीस आयुक्तांना भेटून राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी निवेदने दिली जात आहेत आहे. तर पोलीस आयुक्त कार्यालयात राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळावी, यासाठी मनसेनेही  निवेदन दिले आहे . पोलीस आयुक्त, दोन पोलीस उपायुक्त आणि सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्या परिसरातील पोलीस निरीक्षक यांची यासंदर्भात  बैठकही  झाली. पण  राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
 ताटकळत ठेवण्याच्या रणनीतीची होणार  पुनरावृत्ती ?   
दरम्यान मनसेचे तत्कालीन आमदार हर्षवर्धन जाधव यांना 2011 मध्ये झालेल्या मारहाणीविरोधात राज ठाकरेंनी सभा घेतली होती. मात्र  पोलिसांनी मनसेला ताटकळत ठेवत सभेच्या चार तास आधी परवानगी दिली होती. (Advice from police to change the venue)आता राज ठाकरेंच्या 1 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी पोलीस अशीच रणनीती   आखणार असल्याची चर्चा आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *