'This' strategy of Congress for Maharashtra

Rahul Gandhi’s determination:भारत जोडो यात्रा रोखायची असेल तर रोखून दाखवावी 

अकोला। काँग्रेस नेते राहुल गांधी  (  Congress leader Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात वक्तव्य केल्याने विरोधक आक्रमक झाले असून  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींसह ठाकरे गटावर टीका केली आहे. तर, मनसे प्रमुख राज ठाकरेंनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यावर  राहुल गांधी  यांनी सरकारला भारत जोडो यात्रा रोखायची (government wants to stop Bharat Jodo Yatra, it should stop it) असेल तर रोखून दाखवावी अशी भूमिका   मांडली. 

राहुल गांधी म्हणाले की, भारत जोडो यात्रेला सर्वसामान्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद  मिळत आहे. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही यात्रा आता श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावूनच थांबेल, असा निर्धारही राहुल गांधींनी (Rahul Gandhi’s determination) बोलून दाखवला. भारत जोडो यात्रेत शिवसेनेचेही खासदार, आमदार सहभागी झाले आहेत. यातील एका खासदाराने मला सांगितले की, शिवसेना फोडण्यासाठी एका आमदाराला 50 कोटी देण्यात आले. भाजप पैशांच्या, तपास यंत्रणांच्या जोरावर विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, देशात अजूनही चांगले लोक आहेत. जे विकाऊ होते ते विकले गेले, इतर चांगली लोक आमच्यासोबत येतील.असेही राहुल गांधी म्हणाले. 

  शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजप  काहीच बोलत नाही

राहुल गांधी म्हणाले, सध्या देशात अनेक प्रश्न आहेत. देशात महागाई आहे. तरुणांना रोजगार नाहीत. हाती उत्पन्न येत नसल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकरी वेळेत पीक विमा भरतात. मात्र, त्यांना पैसे मिळत नाही. त्यांचे कर्ज माफ होत नाही. ऐन संकटाच्या काळात त्यांना मदत मिळत नाही. मात्र, भाजपचे नेते शेतकऱ्यांवर काहीच बोलत नाही. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप धार्मिक मुद्दे (BJP brings up religious issues to distract the public)पुढे आणतो. जनतेच्या प्रश्नावर आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी यात्रेशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सर्वसामान्यही यात्रेत अपेक्षेने येत आहेत.(Rahul Gandhi’s determination: If Bharat Jodo Yatra is to be stopped, it should be stopped)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *