Rahul Gandhi's criticism of BJP: BJP is presenting a single vision of the country!

Rahul Gandhi’s criticism of BJP:भाजप देशाचे एकच व्हिजन  मांडतोय!

 कालपेट्टा। त्या लोकांना जेवढा दुष्टपणा करायचा असेल, करू द्या. निर्दयी व्हायचे असेल, होऊ द्या. मी तितकाच सज्जन होईल. भाजप देशाचे एकच व्हिजन मांडत आहे ( BJP is presenting a single vision of the country), पण आम्ही देशाचे खरे व्हिजन घेऊन चालत आहोत.   माझी खासदारकी हिरावली, माझे घर हिरावून घेतले, माझ्या मागे पोलिस लावले, पण याने मला काही फरक पडत नाही. मला तुरुंगात टाकले तरी मी प्रश्न विचारतच राहीन.अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi)यांनी भाजपवर (BJP) पुन्हा टीका केली.   

खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच केरळमधील वायनाड या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात (Wayanad  Lok Sabha constituency) पोहोचले. राहुल गांधींनी कालपेट्टा येथे 22 मिनिटांसाठी रोड शो केला. प्रियंका गांधींसह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते त्यांच्यासोबत होते. माझी खासदारकी हिरावल्याने वायनाडशी माझे नाते तुटणार नाही, तर ते अधिक मजबूत होईल, असे राहुल गांधी  म्हणाले. खासदार हा फक्त एक टॅग आहे, ती एक पोस्ट आहे. भाजप तो टॅग काढून घेऊ शकतो, वायनाडच्या लोकांचा आवाज उठवण्यापासून मला रोखू शकत नाही, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

मी 4 वर्षांपूर्वी येथे आलो आणि येथून खासदार झालो. येथे प्रचार करणे माझ्यासाठी वेगळे होते. मी केरळचा नाही, पण तुमच्या प्रेमामुळे मला वाटले की मी तुमचा भाऊ आहे, तुमचा मुलगा आहे.असे स्पष्ट करताना राहुल गांधी म्हणाले,वायनाडच्या लोकांना, देशातील लोकांना स्वतंत्र भारतात राहायचे आहे. जिथे त्यांची मुलं त्यांना हवं ते शिकण्यास, हवं ते करण्यास मोकळे असतील. कुणालाही असा देश नकोय, जिथे फक्त काही निवडक लोकांचेच चालते.त्या लोकांना जेवढा दुष्टपणा करायचा असेल, करू द्या. निर्दयी व्हायचे असेल, होऊ द्या. मी तितकाच सज्जन होईल. भाजप देशाचे एकच व्हिजन मांडत आहे, पण आम्ही देशाचे खरे व्हिजन घेऊन चालत आहोत.

मी योग्य मार्गावर

मी संसदेत गेलो आणि पंतप्रधानांना त्यांचे अदानीसोबतचे नाते सांगण्याबद्दल विचारले. 2014 नंतर श्रीमंतांच्या यादीत अदानी दुसऱ्या क्रमांकावर कसे आले? अदानीला मदत करण्यासाठी भारत आणि इस्रायलमधील संबंध बदलल्याचे मी म्हणालो.ते मला जितका त्रास देतील, त्याने कळेल की मी योग्य मार्गावर आहे. असेही ते म्हणाले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *