Rahul Gandhi: What is the relationship between Modi-Adani? I will keep asking questions

Rahul Gandhi: मोदी-अदानींचे नाते काय? मी प्रश्न विचारतच राहणार

नवी दिल्ली।भारताची लोकशाही धोक्यात आली आहे…(India’s democracy is in danger) या ओळीने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी पत्रकार परिषदेची सुरुवात करताना    ‘अदानी आणि मोदी यांचे नाते काय? ( What is the relationship between Modi-Adani? )  ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात लोकशाहीवर केलेले भाष्य आणि सर्व चोरांना मोदी हे आडनाव का? या विधानावर देखील स्पष्टीकरण दिले. तसेच भविष्यातील योजनाही नमूद केल्या . 
संसद सदस्यत्व रद्द (parliament membership canceled)केल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत (press conference) पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पक्ष कार्यालयात त्यांच्यासोबत प्रियंका गांधी यांच्यासोबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही पाहावयास मिळाले. यावेळी प्रश्नोत्तरात राहुल गांधी यांना कोणते प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांनी त्यावर दिलेले उत्तर… 

 प्रश्न: तुम्ही शहीदांच्या कुटुंबातून आला आहात. तुमची आजी देखील अपात्र ठरल्या. त्या नंतर जनतेत गेल्या. सत्तेवर परत आल्या. आजच्या युगात तर राहुलही अपात्र झाले आहेत. तुम्ही सगळे मुद्दे मांडलेत. चीनचा मुद्दा उपस्थित केला. राहुल गांधीही जनतेत जाणार का? आणि पुन्हा तेच रिटर्न घडेल का…?

राहुल गांधी : भारत जोडो यात्रेत राहुल गांधी साडेचार महिने जनतेत राहिले. हे माझे काम आहे आणि करत राहीन. आजच्या भारतात पूर्वीच्या राजकीय पक्षांना पाठिंबा मिळत असे, मीडिया आणि इतर संस्थांची साथ भेटायची, ती आता भेटत नाही. त्यामुळे विरोधी पक्षांकडे एकच पर्याय आहे. लोकांमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही.

प्रश्न: भारतीय जनता पक्षाने तुमच्यावर ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. यावर तुमचे उत्तर काय असेल?

राहुल गांधी  : माझ्या भारत जोडो यात्रेतील माझे कोणतेही भाषण तुम्ही पाहू शकता. मी तिथे म्हणतोय की सर्व समाज एक आहे. सर्वांनी एकत्र यावे. बंधुभाव असावा. द्वेष नसावा, हिंसा नसावी. हा ओबीसीचा प्रश्न नाही, नरेंद्र मोदीजी आणि अदानीजींच्या नात्याचा प्रश्न आहे. 20 हजार कोटी रुपये, अदानी यांना कुठून मिळाले हे माहीत नाही. त्याबद्दल मी प्रश्न विचारत आहे. त्याला उत्तर हवे आहे. भाजप लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहे. कधी ते ओओबीसींबद्दल बोलतात, कधी परदेशाबद्दल बोलतात. 

 प्रश्न: तुम्ही घाबरत नाही असे सांगितले. मात्र तुम्ही राज्यकर्त्यांच्या निशाण्यावर आहात. संपूर्ण यंत्रणा तुमच्या विरोधात आहे. मग तुमच्यासाठी पुढचा मार्ग काय आहे?

राहुल गांधी  : राज्य कोणतेही असो. मी सत्य पाहतो मला इतर कशातही रस नाही. मी खरे बोलतो राजकारणात ही काही फॅशनेबल गोष्ट नाही. पण ही गोष्ट माझ्या रक्तातच आहे. मला दुसरा कोणताही मार्ग सापडत नाही. तर हे माझे काम आहे. ही माझी तपश्चर्या आहे. जीवन म्हणजे तपश्चर्या. मी तपश्चर्या करत राहीन. मग तुम्ही अपात्र ठरवा, मारहाण करा, तुरुंगात टाकले तरी. माझी हरकत नाही. या देशाने मला सर्व काही दिले आहे.

  प्रश्नः तुमच्यावर हल्ला करणारे भाजप नेते. त्यावर तुम्ही काय सांगाल? शिवाय, वायनाडच्या लोकांचा विश्वास बसत नाही. त्यावर तुम्ही काय म्हणाल?

राहुल गांधी : वायनाडच्या लोकांशी माझे कौटुंबिक नाते आहे. कुटुंब आणि प्रेम यांचे नाते आहे. मला वाटले, वायनाडच्या लोकांना पत्र लिहून त्यांच्यासाठी माझ्या मनात काय आहे ते व्यक्त करावे.

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील  मुद्दे:

 देशातल्या लोकशाहीवर रोज आक्रमण होत आहे, लोकांनी शांत बसून सगळं सहन करावे  अशी अपेक्षा सरकारची आहे.

  गौतम अदाणी यांच्या शेल कंपन्यांना २० हजार कोटी रूपये कुणी दिले? हे पैसे २०० टक्के अदाणी यांचे नाहीत. माझ्यावर कारवाई केली तरी मी प्रश्न विचारत राहणार.

  मी विदेशातून मदत मागितली असे खोटेनाटे आरोप माझ्यावर करण्यात आले. मोदींच्या मंत्रीमंडळातील   मंत्री संसदेत खोटं बोलले. मी त्यांच्या धमक्यांना घाबरणार नाही.

 गौतम अदाणींना पंतप्रधान नरेंद्र मोदी का वाचवत आहेत? अदाणींच्या विरोधात काहीही कारवाई का होत नाही?

मी राहुल गांधी आहे राहुल सावरकर नाही

  माझी खासदारकी रद्द करा, मला तुरुंगात धाडा, मला मी माफी मागणार नाही. मी राहुल गांधी आहे राहुल सावरकर नाही.

  अदाणींवर केलेले आरोप हे भाजपाच्या लोकांना देशावरचे आरोप आहेत असं वाटतं आहे. अदाणी देश आहेत का?

 संसदेत अदाणी आणि मोदी यांची दोस्ती कशी आहे हा फोटो मी दाखवला त्यानंतर भाजपाच्या खासदारांनी माझ्या विरोधात गदारोळ घालण्यास सुरूवात केली. मला पुढे बोलूच दिलं नाही. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून अदाणी आणि मोदी यांचे सलोख्याचे संबंध आहेत.

  माझ्या विरोधात कितीही कारवाया केल्या तरीही मी गप्प बसणार नाही, मी प्रश्न विचारतच राहणार आहे.

  माझी खासदारकी रद्द केली म्हणून मी गुडघे टेकणार असं जर भाजपाला वाटणार असेल तर त्यांना आत्ताच सांगतो की हे होणार नाही.

  सत्य बोलणं हे माझ्या रक्तात आहे. मी सत्य बोलतच राहणार. देशातील  लोकांनी मला प्रेम, आपुलकी, माया दिली आहे. त्यामुळे सत्याच्या मार्गावर चालत राहणं ही माझी तपस्या आहे असेही राहुल गांधी यांनी म्हटले  आहे.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन   हे  महत्त्वाचे मुद्दे मांडले. तसेच  काहीही केले  तरीही मी या सरकारपुढे झुकणार नाही, माफी मागणार नाही असेही राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले आहे. ((Rahul Gandhi: What is the relationship between Modi-Adani? I will keep asking questions))

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *