While clarifying that freedom fighter Savarkar had written a letter of apology to the British, Congress leader Rahul Gandhi directly showed Savarkar's letter of apology to the media in the press conference. Also, show this letter to the Deputy Chief Minister of the state Devendra Fadnavis and Chief Minister Mohan Bhagwat, Rahul Gandhi said. At this time, Rahul Gandhi said that in the letter, Savarkar addressed the British and wrote that 'Sir Mai Aapk Nauk Rahna Chahta Hoon'. Veer Savarkar's signature is also below this letter.

Rahul Gandhi:सावरकरांचे माफीचे पत्र  फडणवीस,मोहन भागवतांनाही   दाखवा

अकोला ।स्वातंत्र्यवीर सावरकरांनी  (freedom fighter Savarkar)इंग्रजांना माफीचे पत्र लिहिले होते, यावर मी ठाम आहे, असे स्पष्ट करताना  काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi)यांनी   पत्रकार परिषदेत थेट  सावरकरांचे माफीचे पत्रच माध्यमांसमोर दाखवले.शिवाय   हे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरसंघलाचक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनाही दाखवा, असेही राहुल गांधी म्हणाले.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, पत्रात सावरकरांनी इंग्रजांना उद्देशून असे लिहिले आहे की, ‘सर मै आपका नौकर रहना चाहता हूँ’. या पत्राच्या खाली वीर सावरकर यांची स्वाक्षरीही आहे. ही स्वाक्षरी केल्यानंतर सावरकरांनी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांनाही अशी सही करण्यास सांगितले होते. असे म्हणून सावरकरांनी सर्व देशासोबत तसेच तेव्हा स्वातंत्र्यलढ्यात असलेल्या काँग्रेसशी विश्वासघात केला होता.याकडेही त्यांनी लक्ष वेधले.(Rahul Gandhi: Show Savarkar’s apology letter to Fadnavis, Mohan Bhagwat too)

… यासाठीच भारत जोडो यात्रा 

   सत्ताधारी पक्षाकडून केवळ तपास यंत्रणाच नव्हे तर न्याय व्यवस्थेवरही दबाब आणला जात आहे. या घटनात्मक समस्यांशिवाय देशात सर्वसामान्यही गंभीर समस्यांना सामोरे जात आहे. तरुणांना सध्या नोकरी मिळण्याची शाश्वती राहिली नाही. शिक्षणासाठी मोठा पैसा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे गोरगरीब चांगल्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आरोग्याच्या सुविधेसाठी खर्च करावा लागत असल्याने सामान्य हवालदील झाले आहेत. तरी देशात सरकारी शाळा, सरकारी दवाखान्यांऐवजी खासगीकरणाला चालना दिली जात आहे. सर्व पैसे उद्योगपतींकडे कसे जातील, याकडेच सरकारचे अधिक लक्ष आहे. या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठीच भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू केल्याचे राहुल गांधी म्हणाले.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *