Rahul Gandhi: I am tired of 'Made in China'!

Rahul Gandhi: मी ‘मेड इन चायना’मुळे कंटाळलो!

नवी दिल्ली ।काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) लोकांचा अभूतपूर्व  प्रतिसाद मिळत असताना   एका सभेला संबोधित करतानाचा राहुल गांधी यांचा  व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘मेड इन चायना’वरुन ( Made in China )केंद्र सरकारवर (targeted the central government)निशाणा साधला आहे. आज देशातील प्रत्येक गोष्ट मेड इन चायना आहे, मी मेड इन चायनामुळे कंटाळलो आहे, असे स्पष्ट करताना  आता चीनशी स्पर्धा करावी लागेल आणि त्यांना पराभूत करावे लागणार असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की, पोलिसांच्या बुटाखाली मेड इन चायना लिहिलेले असते, शर्टच्या मागील बाजूस मेड इन चायना, मायक्रोफोनच्या खाली मेड इन चायना, जिकडे पाहावे तिकडे मेड इन चायना लिहलेले दिसून येते. भारताचा पैसा चीनच्या तरुणांकडे जाऊ नये, तर चीनच्या तरुणांचा पैसा आपल्या देशातील तरुणांकडे यायला हवा. बिजिंगमधील एका तरुणाच्या फोनवर मेड इन कुरुक्षेत्र असे लिहलेले असावे.

 जेव्हा बीजिंगमधील एका दुकानातून एक चिनी तरुण शर्ट खरेदी करतो तेव्हा त्यावर मेड इन फरीदाबाद असे लिहिलेले असावे. हे फरिदाबाद ठिकाण आहे? हा प्रश्न त्याला पडावा. हे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. 21 व्या शतकातील जगात भारताला चीनशी स्पर्धा करावी लागेल आणि चीनला पराभूत करावे लागेल.

  पंतप्रधान ‘मित्रांच्या’ सूचनांचे पालन करताहेत 

चीनला दोन-तीन अब्जाधीश पराभूत नाही करु शकत. केवळ भारतीय शेतकरी, छोटे व्यापारी, तरुण चीनला हरवू शकतात. देशातील बेरोजगार तरुण मिर्ची पकोडे तळत आहेत आणि पंतप्रधान ‘मित्रांच्या’ सूचनांचे पालन करत आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली.(Rahul Gandhi: I am tired of ‘Made in China’!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *