BJP has spread fear, hatred and violence in the country and my Bharat Jodo Yatra is against that. This country will not benefit from violence and hatred. Congress leader Rahul Gandhi made a strong attack today in Shegaon saying that even the people walking on the street will realize in five minutes who is spreading the violence. Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra reached Shegaon, he held a meeting. On this occasion, he addressed the people and the Congress workers. On this occasion, Rahul Gandhi said, Bharat Jodo Yatra started from Kerala to Maharashtra.

Rahul Gandhi:भाजपकडून देशात भय, तिरस्कार आणि हिंसा,त्याविरोधात भारत जोडो यात्रा!

शेगाव । भाजपने देशात भय, तिरस्कार आणि हिंसा पसरवली आहे(BJP has spread fear, hatred and violence in the country) आणि  त्याविरोधात माझी भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra)आहे. या देशाला हिंसेने आणि तिरस्काराने फायदा होणार नाही. रस्त्यावर चालणाऱ्यांनाही पाच मिनिटांत लक्षात येईल की, हिंसा कोण पसरवित आहेत,असा जोरदार हल्लाबोल  काॅंग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi)यांनी आज शेगाव (Shegaon) येथे  केला. 

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा शेगावमध्ये दाखल झाली,त्यांची सभा झाली. यावेळी त्यांनी जनतेसह काॅंग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले.यावेळी  राहुल गांधी म्हणाले, भारत जोडो यात्रा केरळमधून महाराष्ट्रात सुरू झाली. विरोधकांनी सवाल केला होता की, यात्रेची काय गरज? या यात्रेचा काय फायदा होणार? मी म्हणतो, देशातील कानाकोपऱ्यात आज भाजपने हिंसा आणि भय निर्माण  केले आहे. शेतकरी म्हणतात की आम्हाला शेत मालाचा मोबदला योग्य मिळत नाही हे मला असंख्य शेतकऱ्यांनी सांगितले.  हे ऐकून मला त्रास होत आहे. शेतकरी म्हणतात आम्ही काय चुक केली. आमचे कर्ज माफ होत नाही ;पण देशातील धनाड्यांची, अब्जाधिशांची अब्जावधींची  कर्ज माफ होतात.

राहुल गांधी म्हणाले, आपआपसांत भांडणे करुन कुणाचा फायदा झाला. महाराष्ट्रातील संतांनी कधी सांगितले का की, आपसांत भांडणे करा नाही ना..मग आपण का भांडतो? भाजपने कुटुंबात भांडणे लावली पण या भांडणांनी कुटुंबाचे नुकसान होत आहे. देशही एक कुटुंब आहे, या भांडणांनी देशाचा फायदा झाला का? भाजपने माणसे तोडण्याचे काम केले आम्ही ते जोडू असेही ते म्हणाले. शेतकरी आत्महत्या का करतो. पन्नास हजार, एक लाखांचे कर्ज त्यांच्या डोक्यावर असते. परंतु ते आज वाऱ्यावर आहेत. या देशातील पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी जर मनात आणले आणि शेतकऱ्यांना हृदयाशी घेतले आणि त्यांची हाक ऐकली आणि थोडी जरी शेतकऱ्यांची मदत केली तर त्यांचे भले होईल.द्वेषाने या देशाचा कधीच फायदा होणार नाही. विरोधक विचारतील भीती कशाची? जर ते या रस्त्यांवर फिरले असते तर पाच मिनिटात त्यांना ही गोष्ट समजली असती. या राज्यात मागील सहा महिन्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. का केली? कोणत्याही शेतकऱ्याशी बोला, ते म्हणतील आम्हाला योग्य दर मिळत नाही. मी हे ऐकून कंटाळलो आहे,असेही  राहुल गांधींनी सांगितले .मी दुसरा प्रश्न विचारतो, तर ते म्हणतात  विम्याचे पैसे भरले, मात्र नुकसान झाल्यानंतर एक रुपयाही मिळाला नाही. यानंतर ते शेतकरी प्रश्न विचारतात की, शेतकरी आत्महत्या करतो.  कारण ५० हजार एक लाखाचं कर्ज असते. त्यानंतर हजारो शेतकरी आत्महत्या करतात,हेही त्यांनी नमूद केले. 

 युवकांशी संबंधित प्रश्न उपस्थित करताना राहुल गांधी यांनी बेरोजगारीवर परखड  भाष्य केले. ते म्हणाले,  देशातील युवक बेरोजगार आहेत. महाराष्ट्रात फुकट  शिक्षण मिळत नाही. मुलांचे पालक लाखो रुपये शिक्षणासाठी देतात ;पण पुढे काय होते? काय ऐकायला मिळते? काय काम करतात तर मान खाली घालून युवक म्हणतात काहीच नाही, बेरोजगार आहे. उद्योगपती देशाची संपत्ती मिळवतील आणि युवक बेरोजगार होतील.  युवकांचे स्वप्न पूर्ण न होणारा भारत आम्हाला नको. स्वप्न पूर्ण करणारा भारत आम्हाला हवा आहे.असेही राहुल गांधी यांनी नमूद केले. 

महाराष्ट्राला विसरणार नाही

राहुल गांधी म्हणाले, शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आणि महाराष्ट्राचा आवाज आहे. त्यांना घडवण्याचे काम राष्ट्रमाता जिजाऊंनी केले. आपण मला प्रेम आणि सहकार्य केले, आपण आम्हाला खूप काही शिकवले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी खूप काही शिकवले. मी जीवनभर विसरणार नाही की, महाराष्ट्रातील जनतेने मला शक्ती, ज्ञान आणि प्रेम दिले.​(Rahul Gandhi: Fear, hate and violence from BJP in the country, Bharat Jodo Yatra against it!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *