Rahul Gandhi: BJP's defeat is inevitable due to India Alliance

Rahul Gandhi: इंडिया आघाडीमुळे भाजपचा पराभव अटळ 

मुंबई। 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (2024 Lok Sabha elections) केंद्रातील सत्ताधारी भाजपचा (BJP) पराभव अटळ असल्याचा ठाम दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi)यांनी केला.  ते मुंबईमध्ये  इंडिया आघाडीच्या  ( India Alliance)बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. 
यावेळी राहुल गांधी म्हणाले,   देशातील 60 टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करणारे लोक इथे बसले आहेत.  आता को-ऑर्डिनेशन कमिटी स्थापन करण्यात आली आहे.  त्यानंतर जागा वाटपाबाबत समिती नेमली आहे.  इंडिया आघाडीसाठी ही सर्वात मोठी गोष्ट आहे.  असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
 राहुल गांधी म्हणाले, इंडिया आघाडीच्या बैठकीत दोन मोठे निर्णय घेतले आहेत.  आम्ही सर्व एकत्र आल्याने भाजपला निवडणूक जिंकणे अशक्य आहे.  यावेळी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचेही ही बैठक आयोजित केल्याबद्दल आभार मानले.( India Alliance)   
देशाच्या विकासासाठी शेतकरी, कामगार आणि देशातील गरीब जनतेचा मोठा हात असतो.  त्यासाठी आम्ही एकत्र आहोत.  आम्ही इंडियासाठी एकत्र आलो आहोत.  मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप हे भ्रष्टाचाराचे घर झाले आहे.  नरेंद्र मोदी यांनी अदानी  यांची चौकशी करायला पाहिजे.  त्यांची चौकशी केली नाही तर मिलीभगत  असल्याचे स्पष्ट होईल. आज  देशातील 60 टक्के लोकांचे प्रतिनिधी इथे आहेत.  त्यामुळे भाजप जिंकू शकत नाहीत.  भाजप गरिबांचे पैसे निवडक लोकांना देते असा आरोपही  राहुल गांधी यांनी केला.
इंडिया आघाडी देशातील 60 टक्के जनतेचे प्रतिनिधित्व करते. आमच्या व्यासपीठावरून हे स्पष्ट होते. विरोधकांचे आजचे चित्र पाहून भाजपचा आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव होणार असल्याचे स्पष्ट होते. भाजपचा आता कोणत्याही स्थितीत विजय शक्य नाही. या प्रकरणी आम्ही समन्वय समिती स्थापन केली आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
भाजप सरकार गरीबांचे पैसे उद्योगपतींना देत आहे. गरीब शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करणार आहोत. इंडिया आघाडी भाजपला हरवणार असल्याचा विश्वास देखील राहुल गांधी यांनी व्यक्त केला. Rahul Gandhi: BJP’s defeat is inevitable due to India Alliance

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *