Rahul Gandhi: भाजप-आरएसएसकडून  भारताचे विभाजन करण्याचे काम सुरु 

नवी दिल्ली। तुमच्या हृदयात देशभक्ती असेल तर, देशातील कोणत्याही नागरिकाला दुःख झाल्यास तुम्हालाही दुःख होईल. मात्र भाजप-आरएसएसच्या  (BJP-RSS) लोकांना काहीच वेदना होत नाही, कारण ते भारताचे विभाजन (divide India) करण्याचे काम करत आहेत, असा घणाघात काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी केला आहे. 

संसदेत मणिपूरवरील चर्चेसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Prime Minister Narendra Modi) या विषयावर बोलावे (discussion on Manipur in Parliament)  या मागणीवरून  विरोधक आक्रमक झालेले असताना आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान मोदींवर ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत निशाणा साधला आहे.   

ट्विटरवरील व्हिडिओमध्ये (video on Twitter) राहुल गांधी म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरसाठी काय करत आहेत? ते मणिपूरबद्दल काहीच का बोलत नाही? कारण नरेंद्र मोदींचा मणिपूरशी काहीही संबंध नाही. त्यांच्या विचारसरणीने मणिपूर जाळले हे त्यांना माहीत आहे.(discussion on Manipur in Parliament)

 भाजप-आरएसएसला फक्त सत्ता हवी आहे आणि सत्ता मिळवण्यासाठी ते काहीही करू शकतात, असेही  राहुल गांधी यांनी म्हटले आहे.   सत्तेसाठी ते मणिपूर जाळतील, संपूर्ण देश जाळतील. त्यांना देशाच्या दु:खाची पर्वा नाही.असेही त्यांनी म्हटले आहे.(discussion on Manipur in Parliament) 

राहुल  गांधी म्हणाले की, आरएसएस-भाजप आणि काँग्रेसमध्ये वैचारिक युद्ध सुरू आहे. तर काँग्रेसची विचारधारा संविधानाचे रक्षण करणे, देशाला संघटित करणे आणि सामाजिक विषमतेविरुद्ध लढणे आहे. दुसरीकडे काही निवडक लोकांनी हा देश चालवावा आणि देशाची सर्व संपत्ती त्यांच्या हातात असावी, अशी आरएसएस-भाजपची इच्छा आहे. (BJP-RSS is working to divide India) 

 माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी  म्हणाले की, ‘भारत जोडो यात्रे’मध्ये एक नारा निघाला,  द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडायचे आहे. त्यांनी (भाजप) द्वेष पसरवला तरी तुम्ही तिथे जाऊन प्रेमाचे दुकान उघडा. विरोधी आघाडीने एक नाव निवडले इंडिया, एक नाव जे आमच्या हृदयातून बाहेर पडले. आम्ही हे नाव निवडताच नरेंद्र मोदी हे इंडियाला शिव्या देऊ लागले. मोदीजींना इतका अहंकार आहे की ते इंडिया या पवित्र शब्दाला शिवी देत आहे.  असेही त्यांना वाटले नाही.Rahul Gandhi: BJP-RSS is working to divide India

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *