We are not afraid of Prime Minister Narendra Modi after Congress leader Rahul Gandhi's strong reaction after the office of Young India was sealed amid the ongoing investigation by ED in the National Herald case. Let them do what they have to do. Our job is to fight to protect the Constitution. The fight for the honor of the country will continue. Now there will be no satyagraha, now there will be war. It has also been warned.

Rahul Gandhi:भाजपकडून ‘जय जवान, जय किसान’च्या मूल्यांचा अपमान!

नवी दिल्ली| मोदी सरकारच्या  वादग्रस्त ठरलेल्या अग्निपथ योजनेवरून देशात आंदोलन चिघळत असताना काँग्रेसचे नेते   राहुल गांधी यांनीही  मोदी सरकारवर (Modi government) टीकेची तोफ डागली आहे.   ट्विट करत त्यांनी लिहिले आहे  की, ८ वर्षांपासून सातत्याने भाजप सरकारने ‘जय जवान, जय किसान’च्या मूल्यांचा (BJP insults the values ​​of ‘Jai Jawan, Jai Kisan’) अपमान केला आहे. पंतप्रधानांना काळा शेती कायदा मागे घ्यावा लागेल, असे मी यापूर्वीही म्हटले होते. त्याचप्रमाणे देशातील तरुणाईची आज्ञा पाळावी लागेल आणि ‘अग्निपथ’ योजनाही परत घ्यावी लागेल.असे राहुल गांधी  (Rahul Gandhi)यांनी म्हटले आहे. 

मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेवरून देशभरात खळबळ उडाली आहे. अग्निपथ योजनेबाबत देशातील सर्व राज्यांमध्ये आंदोलने होत आहेत. त्याचबरोबर या योजनेवरून राजकारणही चांगलेच तापले आहे. केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना काँग्रेसचे (congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, ज्या प्रकारे कृषी कायदा मागे घ्यावा लागला, त्याच प्रकारे अग्निपथ योजनाही मागे घ्यावी लागेल.या ट्विटद्वारे राहुल यांनी सरकारने सैनिक आणि शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी काँग्रेसकडून असे सांगण्यात आले होते की, रविवारी दिल्लीच्या जंतरमंतरवर पक्ष अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करेल. मात्र ताज्या माहितीनुसार, काँग्रेसचे हे प्रदर्शन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यात अनेक बडे नेते आणि खासदार सहभागी होऊ शकतात. त्याचवेळी पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी  (Priyanka Gandhi)यांनीही ट्विट करून म्हटले की, मी २९ मार्च २०२२ रोजी संरक्षणमंत्र्यांना पत्र लिहून तरुणांच्या या मागण्यांकडे लक्ष देण्याची आणि त्यावर त्वरित तोडगा काढण्याची विनंती केली होती. पण, तरुणांच्या आवाजाला सरकारने महत्त्व दिले नाही.
 
गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय 
देशभरात सुरू असलेल्या या गदारोळात केंद्रीय गृहमंत्रालयाने  (Union Home Ministry) एक ट्विट (tweet)केले आहे. ज्यामध्ये सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये होणाऱ्या भरतीमध्ये 4 वर्षे पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांना किती टक्के आरक्षण दिले जाईल हे सांगण्यात आले आहे. या निमलष्करी दलात अग्निवीरांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *