Pune Lok Sabha India Front Chandusheth Kadam

Pune Lok Sabha:  इंडिया फ्रंटच्या एकजुटीमुळे ‘कोथरूड’  काँग्रेससाठी  ‘लाख’ मोलाचा ठरणार: चंदूशेठ कदम  

 पुणे।  कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत  ‘ एकी’मुळे भाजपचा पराभव सहजशक्य आहे,यावर शिक्कामोर्तब झाले शिवाय   भाजपलाही अहंकार कसा अंगलट येऊ शकतो याचा धडाही  मिळाला.आता  इंडिया फ्रंटच्या (India Front’s) एकजुटीमुळे  ‘कसब्या’ची  पुनरावृत्ती  पुणे  लोकसभा मतदार संघात (Pune Lok Sabha) निश्चितच होणार आहे. विशेष म्हणजे भाजपचा  हक्काचा  कोथरूड विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ‘लाख’ मोलाचा ठरणार असल्याचे भाष्य  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव व  माजी नगरसेवक रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम (Chandusheth Kadam) यांनी केले आहे. 
कसबा विधानसभा  मतदारसंघ हा  भाजपचा  बालेकिल्ला ;पण मतदारांना गृहीत धरणे हेच भाजपला महागात पडले. दिग्गज नेत्यांनी तळ ठोकला, सभा घेतल्या,मोदींच्या नावाचा जयघोष केला  तरीही हक्काचा मतदारसंघ भाजपच्या हातातून निसटला आणि व्यक्तिगत पातळीवर ‘ मी समाजासाठी, समाज माझ्यासाठी’ हे  ब्रीदवाक्य घेऊन समाजकारण करणाऱ्या रवींद्र धंगेकर यांनी ‘कसब्या’तील मतदारांच्या मनात घर केले. इतकेच नाहीतर संपूर्ण  पुणे शहरातील घराघरात धंगेकरांचे नाव आपसूक पोहचले.राज्यात सत्तेचा सातबारा ताब्यात असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना   ‘ मी पणा’ नडला आणि दिल्लीश्वरांपर्यंत कसब्यातील पराभवाचा धक्का पोहोचला. हा धक्का देणारे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर आता पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. सद्यस्थितीत   विधानसभा मतदारसंघ निहाय समीकरणे बदलण्याची भीती महाविकास आघाडीच्या एकीमुळे भाजपला भेडसावत आहे. 
महाविकास आघाडीतील काँग्रेसला पुन्हा पुणे लोकसभा मतदारसंघ काबीज करण्याची संधी चालून आली आहे.याच पार्श्वभूमीवर कोथरूड विधानसभा मतदारसंघ, जो भाजपचा बालेकिल्ला आहे. तिथे  इंडिया फ्रंटचा प्रचार एकजुटीने सुरु आहे. प्रत्येक कार्यकर्ता घराघरात पोहचत आहे. त्यामुळे या मतदारसंघात यंदा समीकरणे बदलणार का ? यावर    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव   चंदूशेठ कदम यांच्याशी संवाद साधला असता,त्यांनी राज्यातील सत्तेचा विचित्र प्रयोग हा मतदारांच्या पचनी पडलेला नाही, याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले ,गत लोकसभा निवडणुकीतील मतांची टक्केवारी पाहिल्यास यंदा कोथरूड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस मुसंडी मारणार असा आशावाद निश्चित आहे. कारण इंडिया फ्रंटचा एकजुटीने प्रचार सुरु आहे. प्रभागनिहाय नियोजन करून प्रत्येक कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरून प्रामाणिकपणे प्रचार करत आहे. घराघरात पोहचत आहे. मतदारांना पक्षाची भूमिका सांगत आहे. भाजपने केलेल्या ‘फोडाफोडी’ च्या राजकारणामुळे मतदारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत.मागीलवेळी मोदी लाट होती मात्र यंदा ती प्रभावहीन ठरेल अशी स्थिती आहे.
कोथरूड मतदारसंघात इंडिया फ्रंटची एकजुटच यंदा बदल घडवणार आहे. सध्या आम्ही प्रभाग निहाय नियोजनपूर्वक प्रचार करत आहोत. संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहोत.  माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, पृथ्वीराज सुतार, शिवसेना शहराध्यक्ष गजानन थरकुडे,विजय खळदकर, तानाजी निम्हण, शिवा मंत्री, दत्ता जाधव, स्वप्नील दुधाने, उमेश कंधारे, डॉ. अभिजीत मोरे,  ॲड अमोल काळे, नेटके, गोसावी, भगवानराव कडू, संदीप मोकाटे, राजू मगर, महेश ठाकूर, राजेश पळसकर, रामदास थरकुडे, गिरीश गुरनानी, ज्योतीताई सूर्यवंशी, कानूभाऊ साळुंखे, शिवाजी सोनार, पांडुरंग गायकवाड, सोमनाथ पवार, गणेश मारणे, अनिकेत कुरपे, किशोर मारणे,  दिलीप गायकवाड, नितीन पवार, पुरुषोत्तम विटेकर, मनिषाताई करपे, रवींद्र माझिरे, किशोरजी कांबळे, सविताताई मते, संतोष डोख, सौ दिपाली डोख, जीवन चाकणकर, रोहित धेंडे, आण्णा राऊत, शीलाताई राऊत, यशराज पारखी, मंगेश निम्हण, संतोष तोंडे, योगेश मोकाटे, भारत सुतार, राज जाधव, आकाश माने,  योगेश सुतार, अनिल घोलप,किशोर मारणे असे  असे इंडिया फ्रंटमधील प्रत्येकजण परिश्रम घेत आहेत. वस्ती भागात आम्ही केलेली कामे हीच जमेची ठरणार आहे. असेही  चंदूशेठ कदम यांनी   सांगितले.
 
 
मतांचे समीकरण अनुकूल 
गत लोकसभा निवडणुकीत  स्व.  गिरीश बापट यांना कोथरूड या भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यातून एक लाख ४८ हजार ५७० मते मिळाली होती तर मोहन जोशी यांना ४२ हजार ३७४ मते मिळाली.   कोथरूडमधून स्व. गिरीश बापट यांना एक लाख सहा हजार १९६ मतांचे मताधिक्य मिळाले होते. हे बापट यांना मिळालेले सर्वाधिक मताधिक्य होते.पण   विधानसभा निवडणुकीत मनसेचे किशोर शिंदे यांना ८० हजार मते मिळाली मात्र विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना २५ हजार ४९५ चे मताधिक्य मिळाले.हाच फरक महत्वाचा आहे.यंदा या मतदारसंघात ४ लाख १० हजार ६३४  मतदारसंख्या आहे. त्यामुळे काँग्रेसला पडलेली  ४२ हजार ३७४ मते आणि शिवसेनेची ३५ हजार  मते  तसेच घटक पक्षातील अन्य मतांचे समीकरण हे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या पथ्यावर पडणार आहे. साधारण एक लाखांवर मते ही महाविकास आघाडीच्या पारड्यात जाणार असल्याचा ठाम दावा  चंदूशेठ कदम यांचा आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *