Kothrud Assembly Constituency Chandni Chowk Chandrakant Patil Medha Kulkarni

Pune City BJP:चांदणी चौकाचे स्टार…  ;पण  कुरघोडीच्या राजकारणात मान्यवरांचे ‘चेहरे’ झाकोळले !

पुणे । मोठा गाजावाजा करत भाजपने (Pune City BJP)चांदणी चौकाच्या नूतनीकरणाचा (renovation of Chandni Chowk) इव्हेन्ट केला. त्यासाठी  चांदणी चौकाचे स्टार (Stars of Chandni Chowk) उजळले अशी जाहिरातबाजीही केली मात्र अंतर्गत शह- काटशहाच्या राजकारणात मात्र मान्यवरांचे ‘चेहरे’ पडल्याने आगामी काळात कोथरूड विधानसभा मतदारसंघ ( Kothrud Assembly Constituency)  कुणाचा हाच मुद्दा भाजपच्या गोटात गाजण्याची दाट चिन्हे आहेत. मतदारांना गृहीत धरण्याची चूक भाजपच्या नेतृत्वाने केल्यास कसब्याची पुनरावृत्तीला भाजपला सामोरे जावे लागू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आतापासूनच रंगत आहे. 
 
पालकमंत्री, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील (Guardian Minister, Kothrud MLA Chandrakant Patil)  आणि माजी महापौर, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (former Mayor, State Chief Secretary Muralidhar Mohol) यांच्या कार्यपद्धतीवर थेट उघड भाष्य करत नाराजी व्यक्त करणाऱ्या कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Former Kothrud MLA Medha Kulkarni) यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केला. मानापमानाच्या नाट्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीए गेट (चांदणी चौक) चौक उड्डाणपूल लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती मेधा कुलकर्णी यांना केल्यानंतर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. त्यात कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कुलकर्णी यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने ‘चांदणी चौकाचे स्टार   उजळले’   या   जाहिरातीतून केलेल्या    कुरघोडीच्या   राजकारणात कोण गारद झाले, याचीच चर्चा आता शहरात विशेषतः भाजपच्या वर्तुळात रंगत आहे. 
चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमावरून भारतीय जनता पक्षातील श्रेयवाद उफाळून आला. मेधा कुलकर्णी यांनी थेट समाजमाध्यमातून नाराजी व्यक्त करताना अप्रत्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी महापौर   मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य केले.  ‘चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या विषयात कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते सहभागी नव्हते. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सध्याचे नेते, माझ्यासारख्यांचे अस्तित्व मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत,’ अशा शब्दात त्यांनी पाटील यांच्यावर शरसंधान साधल्यानंतर या नाराजीची चर्चा आणि त्याचे पडसाद उमटले. त्यात चांदणी चौकाचे स्टार उजळले या जाहिरातीतून श्रेय घेतानाच मेधा कुलकर्णी यांच्या भूमिकेला थारा मिळणार नाही  याची घेतलेली दक्षताच ऐनवेळी ‘पाण्या’त गेल्याने कुलकर्णी यांच्या विरोधात असणाऱ्यांचे ‘चेहरे’ मात्र व्यासपीठावर मेधा कुलकर्णी यांना स्थान मिळाल्याने झाकोळले गेले.
उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी कुलकर्णी यांना दूरध्वनी करून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मेधा कुलकर्णी यांना स्थान देण्यात आले. उड्डाणपुलाच्या कामाची माहिती देताना नितीन गडकरी यांनीही  आवर्जून कुलकर्णी यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली.इतकेच नाहीतर  कार्यक्रमानंतर गडकरी स्वत: त्यांच्या निवासस्थानी गेले व  त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.तसेच उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीही भेटीसाठी वेळ देण्याचे आश्वासन दिल्याचे माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.दुसऱ्या दिवशी समाजमाध्यमावरून माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी आभारही मानले.  मात्र त्यानंतर पक्षाची विचारधारा हा मुद्दा पुढे करताना मेधा कुलकर्णी यांच्या भूमिकेला कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांनी आक्षेप घेतला;पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले आहे. त्यामुळे कुलकर्णी यांनी उल्लेख केलेल्या ‘आधुनिक नेते कोण’ या मुद्द्यांशी  कोथरूड मंडल अध्यक्षाचा संबंध येतोच कसा ? हा आक्षेप नोंदविताना  ‘ बोलविते धनी कोण ? या मुद्द्याकडेही कोथरूड मतदारसंघातील नागरिक लक्ष वेधत आहेत. 
 
चर्चेचे गुऱ्हाळ … सावध पवित्रा 
परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी पुन्हा हा मतदारसंघ काबीज करतात का ? त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते का ? या प्रश्नांसह कोथरूड विधानसभा मतदारसंघासह पुणे शहरातील भाजपमध्ये सुरु असलेल्या गटबाजीला लगाम घालण्यात भाजपच्या नेतृत्वाला यश मिळेल का आणि आगामी विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुनर्वसन  भाजपचे नेतृत्व  कसे करणार? हक्काचा कसबा विधानसभा मतदारसंघ गमवावा लागला. आता आगामी निवडणुकीत जनसंघाचा असणारा कोथरूड विधानसभा मतदारसंघ शाबूत ठेवण्यासाठी भाजपचे नेतृत्व सावध पवित्रा घेत आहेत का? ७० हजार मताधिक्क्य मिळवणाऱ्या कुलकर्णी यांचा मतदारसंघ हिरावून घेणाऱ्या पालकमंत्री पाटील यांना मिळालेले २५ हजारांचे मताधिक्य आगामी निवडणुकीत आणखी किती  खालावेल   यावर आता चर्चेचे गुऱ्हाळ रंगत आहे आणि भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर येत आहे.    परिणामी शहर भाजपमधील पदाधिकाऱ्यांनी आता सावध पवित्रा घेण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *