पुणे । गुंडशाही व झुंडशाहीच्या विरोधात शुक्रवार दि. ९ रोजी ‘निर्भय बनो’ ची ( ‘Nirbhay Bano’) होणारी सभा उधळून टाकण्याचा इशारा देणाऱ्या भाजपला(BJP) रोखण्यासाठी आता काँग्रेस(Congress) सरसावली असून कोणत्याही स्थितीत ‘निर्भय बनो’ ची ( ‘Nirbhay Bano’) सभा होणारच आणि लोकशाही वाचविण्यासाठी (protect democracy) इंडिया आघाडीतील सर्वच घटक पक्ष कटिबद्ध असून या सभेला संरक्षण देणार असल्याची ग्वाही पुणे शहर काँग्रेसने (Pune City Congress) दिली आहे.
यासंदर्भात पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी (Pune City Congress President Arvind Shinde)म्हटले आहे कि, भाजपचे शहराध्यक्ष अध्यक्ष धीरज घाटे यांनी ‘निर्भय बनो’ ची सभा उधळून टाकणार अशी धमकी दिली आहे आणि तसे त्यांनी तेथील पोलीस स्टेशनला निवेदनही दिले आहे. वास्तविक आता नविन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्याचा चार्ज घेतला आहे. ते कायदा व सुव्यवस्थेबाबत अतिशय दक्ष आहेत. त्यांनी पुण्यातील गावगुंड ते मोठया गुंडाची ‘परेड’ही पोलीस आयुक्तालय येथे काढली होती. त्यामुळे ‘निर्भय बनो’ ची होणारी सभा उधळून टाकण्याची धमकी देणाऱ्या धर्मांध गुंडाचा बंदोबस्त पोलीस आयुक्त निश्चित करतीलच मात्र या सभेसाठी इंडिया आघाडीमधील सर्व घटक पक्ष व महाविकास आघाडी हे तेथे लोकशाही वाचविण्यासाठी आणि ‘निर्भय बनो’ सभा ही व्यवस्थित पणे पार पाडण्यासाठी संरक्षण देण्याचे काम करणार असल्याचेही अरविंद शिंदे यांनी म्हटले आहे.
संविधानाने आपल्याला आपले मत मांडण्याचा अधिकार, भाषणाचा अधिकार दिलेला आहे. असे असतानाही काही संविधान विरोधी लोक गुंडशाही व झुंडशाहीच्या माध्यमातून पुण्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तो प्रयत्न आम्ही कदापीही यशस्वी होवू देणार नाही. लोकशाही या असल्या धमक्यांना घाबरत नाही. उद्याची सभा ही यशस्वीरित्या पार पडेल याची आम्ही पूर्ण तयारी केली आहे. असेही पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी म्हटले आहे.