punebjppolitics pune city devlopment

Pune BJP:विकासावर मौन बाळगू या​,भक्तीवर बोलू या !

लोकसभा निवडणुकीसाठी​(Lok Sabha elections​)सर्वच पक्षांनी दंड थोपटले आहेत.लोकसभा पाठोपाठ विधानसभा आणि त्यानंतर महापालिका निवडणुका(assembly and then the municipal elections​)रंगणार आहेत.​भाजपनेच कार्यकर्त्यांना तसे आश्वासन दिले आहे. त्यामुळेच लोकसभेच्या निमित्ताने ‘व्होट बँक’ बळकट करण्यासाठी ​पुणे शहर भाजपने​ (Pune BJP)आता  ‘भक्ती’वर भर दिला आहे.त्यानुसार शहरात तसे कार्यक्रम​ही  पार पडले​ आणि फेब्रुवारी महिन्यात ​तर आणखी कार्यक्रमाची आखणी ​पुणे भाजपने​ (Pune BJP​)केली आहे.कोणत्याही स्थितीत भक्तीच्या 
(devotion​)वाटेवर मतदारांना आणायचे आणि पाच वर्षात पुण्यासाठी काय भरीव ​कार्य (development​)केले हेच झाकायचे​ ही   शक्कल त्यामागे आहे.त्यामुळे पुणेकर भक्तीत तल्लीन होतात की, विकासाच्या मुद्द्यावर रान उठवतात हे आगामी काळच सांगणार आहे. तूर्तास भक्तीमय कार्यक्रमांची रेलचेल करून मतदारांना आकृष्ट करण्याची खेळी असली तरी ती कितपत यशस्वी होते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.   https://www.flipkart.com/48-laws-power-satta-shaktiche-niyam-marathi-language/p/itma71ccdfb6387b?pid=9789391629601
गेल्या पाच वर्षात कोणती ठोस कामे केली ?हा प्रश्न ​मतदारांनी विचारल्यावर काय सांगायचे ही चिंता भाजपला भेडसावत आहे. मेट्रोला चालना दिली​ म्हणजे विकास झाला असे म्हणून चालणार नाही आणि मेट्रोला चालना दिली  हे जितके खरे आहे,त्याहीपेक्षा मेट्रोचा ठराव कुणी दिला यावरून श्रेयाचे भागीदारही अन्य राजकीय पक्ष म्हणजेच काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी हेही आहेत हे वास्तव आहे.​त्यामुळे  कोणत्या ठोस विकासकामांच्या यादीवर​ प्रभागांमध्ये कसे मतदान मिळणार ? ​हाही प्रश्न भाजपसमोर उभा ठाकला आहे.
गतवेळी मोदी लाट होती. त्यामुळे विजय सहजसाध्य झाला.ज्यांना कोण ओळखत नव्हते, ते पालिकेच्या सभागृहात दाखल झाले.​मात्र  आज पंतप्रधान मोदींची लोकप्रियता राम मंदिराच्या उभारणीमुळे टिकवून ठेवण्याची रणनीती भाजपने जरी यशस्वी केली असली तरी दुसरीकडे महागाईचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यामुळे मतदारांना भुलविण्यासाठी भक्तीमय कार्यक्रमाची रेलचेल हे​च  भाजपचे लक्ष्य आहे.https://www.flipkart.com/48-laws-power-satta-shaktiche-niyam-marathi-language/p/itma71ccdfb6387b?pid=9789391629601
त्यामुळेच लोकसभेसाठी इच्छुक असणारे ​आता अशा कार्यक्रमाची आखणी करत आहेत.बागेश्र्वर बाबा नंतर जया किशोरी या आता पुण्यात येणार आहेत तर आळंदीत संतांचे महासंमेलन रंगणार आहे.​विशेष स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कथित आधुनिक संत  ​ज्यात श्री श्री रविशंकर,योगी आदित्यनाथ, रामदेव बाबा यासह अनेकांचा सहभाग असणार आहे. गीतभक्तीच्या या विशेष कार्यक्रमात वेद शास्त्र आणि त्याचे रहस्य यावर भर असणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे   अयोध्यावारीचे विधानसभा निहाय नियोजन सुरू असल्याची​ही  चर्चा ​ आहे आणि जास्तीस जास्त मतदारांना नेण्याचे आणि त्याबदल्यात मतांचे दान ​पदरात पाडून घेण्याचा खटाटोप सुरू झाला आहे.कोणत्याही स्थितीत पाच वर्षात शहरात काय प्रभागात कोणता विकास साध्य झाला हे​ झाकण्याची शक्कल यामागे आहे तर शिखर परिषदेच्या निमित्ताने​’ तुमच्या कल्पना ऑनलाईन नोंदवा आणि पुणे घडवू या ​’अशा आशयाचे​ बॅनर झळकवून पुणेकरांना साद घालण्याचा प्रकार सुरू झाला आहे.​मात्र त्यात पाच वर्षात भाजप अपयशी ठरली अशीच कबुली समजायची का?असा सवाल ​ उपस्थित ​होत आहे​.  शहरात  कोणती कामे मार्गी लावली .कोणत्या सुविधा नागरिकांना दिल्या यातून सहिसलामत सुटका करून घेण्या​चा  भाजप​चा हा ​प्रयत्न असला ​ तरी ज्यांच्या ‘ कुबड्या ‘ घेतल्या त्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला त्याचा फायदा मिळणार आहे.त्यामुळे विकासकामांची पूर्ती साजरी करताना त्या गटाला पुढे करण्याची खेळी भाजपला अंगलट येणार आहे. ​नुकतेच  काँग्रेसने आंदोलन केले. त्यात ​श्रेयावरून राडा झाला.​काँग्रेसने काम मार्गी लावले मात्र भाजपने ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ ओढल्या असा आरोप झाला ;पण त्या कामाच्या उदघाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्याचा डाव भाजपने खेळला. त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली. त्यात  आंदोलन कव्हर करणाऱ्या ​माध्यमांच्या प्रतिनिधींवर  पोलिसां​नी दडपशाही केली. पण त्यावर भाजपच्या गोटातून ​निषेधाचे एक चकार शब्दही ​निघाले नाहीत. माजी महापौर मुरलीधर मोहोळ वगळता भाजपच्या अन्य कुणी निषेधाचे साधे ट्विट केले नाही.नंतर सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला.प्रत्यक्षात माध्यमांशी आपुलकीचे नाते, घरोबा असे चित्र​ रंगवायचे   आणि दुसरीकडे ​’धाब्यावर न्या​’ अशा शब्दात अवहेलना करायची आणि तिसरीकडे सत्तेचा धाक दडपशाही करून त्यावर ​चिडीचूप बसायचे  ​ या प्रकाराने आपुलकीचे , जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणाऱ्या भाजप​चा खरा चेहरा उघडकीस आला आहे​ आणि आता माध्यमकर्मीच काय पुणेकर त्यावर चिंतन करत आहेत.त्यामुळे विकासावर बोलायची वेळ आली तर धाक दडपशाही करायची, भक्तीमय वातावरण निर्माण करून त्यात पुणेकरांना गुंतवून ठेवायचे. सोईने हवी तशी भूमिका घेऊन काय साध्य होणार आहे या प्रश्नापेक्षा दिशाभूल केल्याशिवाय राजकारण होतच नाही हेच यानिमित्ताने ​भाजपने अधोरेखित ​केले आहे. Pune BJP: Let’s keep silent on development, let’s talk about devotion!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *