भोपाळ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येसाठी तयार राहा(Prepared to kill Prime Minister Narendra Modi), असे प्रक्षोभक विधान मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते राजा पटेरिया (Raja Patria) यांनी केले आहे. त्यांचा यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात ते आपल्या कार्यकर्त्यांना चिथावणी देत असल्याचे दिसून येत असले तरी पटेरिया यांनी आपल्या व्हिडीओमधील विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्ट केले. संविधान वाचवायचे असेल तर हत्या म्हणजे त्यांना पराभूत करणे आहे,असे स्पष्टीकरण दिले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पटेरिया कार्यकर्त्यांपुढे बोलताना म्हणतात कि, मोदी निवडणूक पद्धत संपुष्टात आणतील. धर्म, जाती भाषेच्या आधारावर देशात फूट पाडतील. त्यांच्यामुळे दलित, आदिवासी व अल्पसंख्यकांचे जीवन संकटात सापडले आहे. संविधान वाचवायचे असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार राहा. हत्या म्हणजे त्यांना पराभूत करणे आहे. त्यांचा हा व्हायरल व्हिडिओ पन्ना जिल्ह्यातील पवईचा असल्याचे सांगितले जात आहे.वादग्रस्त व्हिडिओ उजेडात आल्यानंतर माजी मंत्री राजा पटेरिया यांनी आणखी एक व्हिडिओ जारी करून आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले व्हायरल झालेला व्हिडिओ कार्ड वितरणाच्या काळातील आहे. त्यातील मोदींच्या हत्येसंबंधीच्या विधानाचा विपर्यास करण्यात येत आहे. मी गांधींना मानणारा व्यक्ती आहे. मी अशा प्रकारचे विधान करू शकत नाही.माझा म्हणण्याचा अर्थ राजकीय दृष्टिकोनातून होता. संविधान वाचवण्यासाठी मोदींना हरवणे गरजेचे आहे. अल्पसंख्यांक , दलित व आदिवासींच्या संरक्षणासाठी बेरोजगारी दूर करण्यासाठी त्यांना पराभूत करणे आवश्यक आहे. पण माझे विधान अत्यंत चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. (Provocative legislation by Congress leader)