One thing should be kept in mind by those who are trying to weaken the caste and religious atmosphere in the country and force people to break the law. On the same lines, MNS president Raj Thackeray and BJP have also been criticized. However, MNS president Raj Thackeray, who has taken on the role of a blueprint for development and a fierce opposition party, has now embraced fanatical Hindutva. It has taken an aggressive stance. In addition, the politics of the state is hot in the summer. Shiv Sena is also criticizing Raj Thackeray's stand on the issue of bhongya on the mosque. In it, a cannon of criticism was hurled at Raj Thackeray from the match which is the mouthpiece of Shiv Sena today, but even though BJP was indirectly targeted in it, only Raj Thackeray has been kept on the 'radar'.

मोदींचा चेहरा नसेल तर… अग्रलेखातून पुन्हा स्तुती

पुणे​।​
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुन्हा स्तुती करण्यात ​आली  आहे. विशेष म्हणजे ‘मोदी है, तो मुमकिन है’ अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून ही स्तुती करण्यात आली आहे. त्यातही मोदींचा चेहरा नसेल तर भाजपामधील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांमध्येही पराभूत होतील यावर ​ अग्रलेखात विशेष भर दिला आहे. काल – परवा पर्यंत मोदी-  शहा ही जोडी देशाला सर्वश्रुत होती. मात्र  भाजपचे अध्यक्ष जे.पी . ​नड्डा  यांच्या  कार्यपद्धतीवरही​ विशेष ​ भाष्य करण्यात आले आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की​,​ भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी​ डॉ. नड्डा आल्यापासून पक्षात सतत फेरबदल होत आहे​त. ​ पंतप्रधान मोदी यांच्या मनात जे आहे​,​ ते डॉ​. नड्डा  यांच्या माध्यमातून करून घेतले जात आहे​. ​ उत्तराखंड व कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलामागे हेच​ दिसून आले आहे​. ​ गुजरातचे मुख्यमंत्री एका फटक्यात बदलण्यात आले.संपूर्ण मंत्रिमंडळ नवेकोरे करून टाकले​. ​ मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे प्रथमच आमदार झालेले नेते​;​ पण आता मोदी​- नड्डा यांनी  असा धक्का दिला की​,​ राजकारणात काहीच अशक्य नाही​. ​​रूपाणी यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना मोदी व ​नड्डा यांनी घरी बसवले​. ​ ​ज्या 24 मंत्र्यांनी शपथ घेतली​. ​ ते सर्व प्रथमच मंत्री झाले​. ​ नितीन पटेल यांच्यासह सर्व जुन्या जाणत्यांना मोडीत काढले​. ​ हा नवा डाव गुजरातमध्ये मोदी व ​नड्डा यांनी  मांडला आहे​. ​ राजेंद्र त्रिवेदी हे विधानसभेचे अध्यक्ष होते​. ​ त्यांनाही पायउतार केले व मंत्री केले  रूपाणी    यांच्यामागे अमित शहा ​यांचे  पाठबळ होते​;​ पण  रूपाणी    व त्यांच्या संपूर्ण ​मंत्रिमंडळाला घरचा रस्ता दाखवून मोदी​- ​​नड्डा  जोडीने एक जोरदार राजकीय संदेश स्व पक्षास दिला आहे​. ​ त्यात मावळते उपमुख्यमंत्री नितीन पटेल ते स्वतःला ​’​हेवीवेट​’​ समजत होते​. ​रूपाणी    यांना मुख्यमंत्री केले​. ​ तेव्हाही नितीन पटेल हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते व आता  रूपाणी   यांना बाजूला केले​. ​ तेव्हा इथे​ही तेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते​. ​ एक तर ते गुजरातमधील पाटीदार समाजाचे महत्वाचे नेते आहेत व ​पाटीदार  समाजात त्यां​चे  वजनही आहे. मात्र गुजरातमध्ये झालेल्या आंदोलनापासून पाटीदार समाज अस्वस्थ आहे​. ​ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाटीदार समाजाच्या असंतोषाचा फटका बसेल आणि ​गुजरातमध्ये  भाजपची ​मोठी ​फजिती होईल​,​ याचा अंदाज आल्याने  रूपाणी   आणि​ त्यांचे  संपूर्ण मंत्रिमंडळ घरी पाठवले​;​ पण नेतृत्वाची घडीच बदलून टाकताना पाटीदार समाजा​चे नितीन पटेल यांनाही मोडून काढले​. ​ नव्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह 14 मंत्री पाटीदार​-​ ओबीसी समाजाचे आहेत​. ​ हे एक धाडसाचे काम असले तरी स्वपक्षात असे धाडसी पा​ऊले​ मोदीच टाकू ​शकतात.
 
मोदी है​,​ तो मुमकिन है​…गेल्या काही महिन्यात एक आसाम सोडले तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. पश्चिम बंगालमध्ये अमित शहा यांनी जीवाची बाजी लावली ​. ​केरळा​त ​​ ई  ​श्रीधरनसारखा मोहरा ​कमी लावला होता​. ​ अमित ​शहा  हे कोणताही चमत्कार ​घडवू  शकतात​. ​ अशी प्रचार मोहीम राबवली गेली ​;​पण ​अमित शहा यांच्या काळात महाराष्ट्रात पंचवीस वर्षे जुन्या शिवसेना-भाजप युतीचा तुकडा पडला​. ​ आता तर भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले​. ​ पश्चिम बंगा​लमध्ये  कपाळमोक्ष झाला​. ​ जे​. ​पी​. ​ नड्डा यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी दुरूस्तीचे काम हाती घेतले असावे ते यामुळेच ​. ​मोदी हाच भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आहे व बाकी सारे ​फाटके मुखवटे आहेत​. ​ मोदींचा चेहरा नसेल तर भाजपातील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांमध्येही पराभूत होतील​. ​ मोदी यांना स्वतःचे हे बलस्थान माहित असल्यामुळे त्यांनी 2024 च्या तयारीसाठी ​साहसी पाऊले  टाकायला सुरुवात केली आहे​. ​ तीन राज्यांचे मुख्यमंत्री मोदी​- नड्डा जोडीने बदलले​.​ गुजरातमध्ये तर सारी जमीन उकरून ​किडकी झाडे मुळापासून उपटून टाकली​.​ मध्यप्रदेश​,​ हिमाचल​,हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांवर ​मोदी – नड्डा यांचे बारीक लक्ष आहे​.​ मोदींनी गुजरात​मध्ये ​ सर्वच बदलले​.​ या ​धसक्यातून  पक्षाला सावरायला वेळ लागेल व हाच प्रयोग त्यांची सरकारें ​नसलेल्या  प्रदेशात​ही ​ ​होऊ शकतो​. ​’​मोदी है​,​ तो मुमकिन​ हैं’​​  म्हणायचे ते ​इथे!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *