Don't be surprised if you see a party in the forefront with MIM in the future. The BJP never needs the help of a party like MIM. Therefore, there is no fact in the allegation made by BJP's B team. BJP leader Chandrasekhar Bavankule has replied that Prime Minister Narendra Modi does not need a B team.

BJP leader Chandrasekhar Bavankule : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘बी टीम’ची गरज  नाही

मुंबई।
एमआयएमसोबत पुढील काळात आघाडीमधील एखादा पक्ष सोबत दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. एमआयएमसारख्या पक्षाची भाजपाला कधीही मदतची गरज नाही. त्यामुळे भाजपाच्या बी टीमचा जो आरोप केला जातोय, त्यात कोणतेही तथ्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बी टीमची आवश्यकता नाही, असे प्रत्युत्तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे  (BJP leader Chandrasekhar Bavankule)यांनी दिले आहे. 
शिवसेनेने(SHIVSENA ) शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे.  प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र, ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला विदर्भात संपवण्याचे  वक्तव्य मुख्यमंत्र्याकडून केले  जात आहे. ते  योग्य नाही.
विदर्भात त्यांना निवडणुकीत नोटा पेक्षाही कमी मतदान होईल. गोवा आणि उत्तर प्रदेशप्रमाणेच त्यांची स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *