The date for the Presidential elections has been announced today. Voting will take place on July 18 and counting of votes will take place on July 21. An announcement to this effect will be made by the Election Commission today with reference to Article 62 of the Constitution. President Ramnath Kovind's term ends on July 24. But before the presidential election this year, the Rajya Sabha will be a tough test for the ruling BJP and the opposition.

Presidential election announced: निवडणुकीपूर्वी भाजप आणि विरोधी पक्षांची कठीण परीक्षा

नवी दिल्ली ।राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची  (Presidential election 2022)तारीख आज  जाहीर करण्यात आली   १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. घटनेच्या अनुच्छेद ६२ चा संदर्भ देत याबाबतची घोषणा निवडणूक आयोगाकडून (Election Commission)आज करण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे.मात्र यंदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी राज्यसभेत ( (Rajya Sabha ) सत्ताधारी  भाजप (BJP) आणि विरोधी  (opposition) पक्षांसाठी  कठीण परीक्षा ठरणार  आहे. 

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांव्यतिरिक्त, सर्व राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी येथील विधानसभा सदस्य हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करू शकतात.जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी राज्यसभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांची कठीण परीक्षा आहे. १० जून रोजी वरिष्ठ सभागृहाच्या ५७ जागांसाठी चुरशीची लढत होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसद सदस्य (राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही) आणि राज्य विधानसभेचे सदस्य हे मतदार असतात. एकूण खासदारांची संख्या ७७६ आहे (राज्यसभा २३३ लोकसभा ५४३) प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य ७०८ आहे. आमदारांच्या बाबतीत देशभरात एकूण४,१२० मते आहेत.१९७१ च्या जनगणनेनुसार, त्यांच्या मताचे मूल्य राज्यानुसार बदलते. आसाम, त्रिपुरा आणि नागालँडमधून तीन जागा जिंकून २४५ सदस्यांच्या सभागृहात भाजपने (BJP)अलीकडेच १०१ पर्यंत मजल मारली आहे. १६ रिक्त पदांमुळे राज्यसभेत सध्या ९५ सदस्य आहेत.

‘यांना ‘ मतदानाचा अधिकार नाही 

राज्यसभा, लोकसभा किंवा विधानसभेच्या नामनिर्देशित सदस्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नाही. त्याचप्रमाणे राज्यांच्या विधान परिषदेच्या सदस्यांनाही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार नाही. २०१७ मध्ये राष्ट्रपती निवडणुकीसाठी १७ जुलै रोजी मतदान झाले होते आणि २० जुलै रोजी मतमोजणी झाली होती.(Presidential election announced: Tough test for BJP and Opposition before elections)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *